'विराट कोहलीनं तंत्रशुद्ध फलंदाजी बाबर आझमकडून शिकावी'; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचं विधान

Aaqib Javed on Virat Kohli: पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान सुपर लीगमधील 'लाहोर कलंदर' संघाचे प्रशिक्षक अकिब जावेद यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 04:34 PM2021-04-11T16:34:16+5:302021-04-11T16:34:52+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli Can Improve His Technique By Looking At Babar Azam Says Aaqib Javed | 'विराट कोहलीनं तंत्रशुद्ध फलंदाजी बाबर आझमकडून शिकावी'; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचं विधान

'विराट कोहलीनं तंत्रशुद्ध फलंदाजी बाबर आझमकडून शिकावी'; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचं विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Aaqib Javed on Virat Kohli: पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान सुपर लीगमधील 'लाहोर कलंदर' संघाचे प्रशिक्षक अकिब जावेद यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. विराट कोहलीनं आपल्या फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची फलंदाजी पाहावी, असं अकिब जावेद म्हणाले आहेत. तर बाबर आझमनं विराट कोहलीकडून फिटनेसच्या टीप्स घ्याव्यात असंही अकिब जावेद म्हणाले. क्रिकेट पाकिस्तानला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. (Virat Kohli Can Improve His Technique By Looking At Babar Azam, Says Aaqib Javed)

विराट कोहली आणि बाबर आझम यांची तुलना करणं कधीच थांबवता येणार नाही. दोघांचीही तुलना याचसाठी केली जाते कारण ते सध्याचे सर्वोत्तम फलंदाज आहेत. याशिवाय दोन्ही खेळाडू पारंपारीक विरोधी संघांचे खेळाडू असल्यानं दोन्ही देशांचे चाहते यावर सोशल मीडियात वादविवाद करत असतात, असंही ते म्हणाले. 

कोहलीबाबत केलं वादग्रस्त विधान
"विराट कोहलीकडे बाबर आझमच्या तुलनेनं चांगले शॉट्स आहेत. पण त्याची एक कमकुवत बाजू देखील आहे. चेंडू स्विंग करु लागला तर कोहली गोलंदाजाच्या जाळ्यात सहज अडकला जातो. जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर कोहलीला खेळताना आपण सर्वांनी हे पाहिलंच आहे. पण बाबर आझमच्या फलंदाजीत मला कोणतीच कमकुवत बाजू दिसत नाही. तंत्रशुद्ध फलंदाजीच्या बाबतीत बाबर आझम विराट कोहलीपेक्षा उजवा आहे", असं अकिब जावेद म्हणाले. 

बाबर आझमनं जर विराट कोहलीकडून फिटनेस टिप्स घेतल्या आणि त्यादृष्टीनं फिटनेसवर प्रयत्न केले तर तो आणखी चांगला खेळाडू होईल, असंही जावेद पुढे म्हणाले. 

२५ वर्षीय बाबर आझम पाकिस्तानच्या वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाबर आझमनं अतिशय कमी वेळात खणखणीत फलंदाजीच्या जोरावर चांगलं यश प्राप्त केलं आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बाबर आझमच्या फलंदाजीत साम्य असल्याचं अनेक क्रिकेट समीक्षक बोलत आले आहेत. 

बाबर आझमच्या सातत्यपूर्ण कामगिरीचं केलं कौतुक
अकिब जावेद यांनी बाबर आझमच्या फार्मबाबतही महत्वाचं विधान केलं. "गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाकिस्तानच्या फलंदाजीचा ५० टक्के भार एकटा बाबर आझम उचलत आहे. त्याच्याकडून होणारी सातत्यपूर्ण कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. पाकिस्तानचा संघ अतिशय नशीबवान आहे की संघाच्या अतिशय कठीण क्षणी बाबर आझमसारखा गुणवान खेळाडू संघाला मिळाला", असं अकिब जावेद म्हणाले. 
 

Web Title: Virat Kohli Can Improve His Technique By Looking At Babar Azam Says Aaqib Javed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.