भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांनी मंगळवारी सोशल मीडियावरून एक आनंदाची बातमी सांगितली. विराट व अनुष्का यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हातभार लावण्यासाठी जवळपास ७ कोटींचा निधी गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. त्यांनी स्वतः या चळवळीत दोन कोटींची मदत केली. चार दिवसांपूर्वी त्यांनी सुरू केलेल्या चळवळीत आता ५ कोटी जमा आले आहेत आणि ध्येय गाठण्यासाठी त्यांना १.७८ कोटी आणखी जमा करायचे आहेत. विराट व अनुष्का यांनी इस्टग्राम स्टोरीवरून ही आनंदाची बातमी दिली.
Ketto यांच्यासोबत मिळून ही दोघं निधी गोळा करत आहेत आणि त्यातील प्रत्येक रक्कम ही कोरोना लढ्यासाठी वापरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ''देशातील आरोग्य यंत्रणा न थकता, न थांबता कोरोना व्हायरसशी मुकाबला करत आहेत. पण, आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं आपल्या आरोग्य यंत्रणेलाच आव्हान दिलं आहे. आता आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला मदत करण्याची गरज आहे. अनुष्का आणि मी Kettoवर एक मोहीमु सुरू केली आहे. त्यातून जमा होणार निधी हा कोरोना लढ्यासाठी वापरला जाणार आहे. तुमचा पाठिंबाही महत्त्वाचा आहे. आयुष्य वाचवण्यासाठी छोटीशी मदतही खूप मोठी असते,'' असे या दोघांनी चार दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटले होते.
![]()
दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं सोमवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू कोरोना लसीचा पहिला डोस घेत आहेत. शिखर धवन, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा यांच्यापाठोपाठ विराटनंही पहिला डोस घेतला. त्यानं इतरांनाही शक्य तितक्या लवकर ही लस घ्या, असे आवाहन केलं आहे.
इंग्लंडला जाण्यापूर्वी घ्यावी लागेल फक्त कोव्हिशिल्डचीच लस
भारतीय खेळाडू काही दिवसांसाठी कुटुंबीयासोबत राहणार असून नंतर इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहेत. १८ ते २३ जून या कालावधीत तेथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल होणार आहे आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका होणार आहे. चार महिन्यांच्या या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंना फक्त कोव्हिशिल्ड ( Covishield ) ची लस घ्यावी लागेल, असे वृत्त Times Nowने प्रसिद्ध केलं आहे.