Vijay Hazare Trophy 2025-26 Points Table : रोहित-विराटच्या संघासह कोणता संघ कितव्या स्थानी? जाणून घ्या सविस्तर

एकूण ३८ संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत एलिट गटातील सहा संघ आणि प्लेट गटातील एक संघ पहिल्या तीन फेरीनंतर अपराजित असल्याचे पाहायला मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:55 IST2025-12-30T17:52:54+5:302025-12-30T17:55:11+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Vijay Hazare Trophy 2025-26 Points Table: Which team is ranked at what position, including Rohit-Virat's team? | Vijay Hazare Trophy 2025-26 Points Table : रोहित-विराटच्या संघासह कोणता संघ कितव्या स्थानी? जाणून घ्या सविस्तर

Vijay Hazare Trophy 2025-26 Points Table : रोहित-विराटच्या संघासह कोणता संघ कितव्या स्थानी? जाणून घ्या सविस्तर

Vijay Hazare Trophy 2025-26 Points Table : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील २०२५–२६ च्या हंगामात अनेक स्टार क्रिकेटरचा जलवा पाहायला मिळत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या स्पर्धेत खेळताना दिसल्यामुळे ही स्पर्धा अधिक चर्चेत राहिली. एकूण ३८ संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत एलिट गटातील सहा संघ आणि प्लेट गटातील एक संघ पहिल्या तीन फेरीनंतर अपराजित असल्याचे पाहायला मिळाले आहे. इथं एक नजर टाकुयात गुणतालिकेत रोहित-विराच्या संघासह  कोणता संघ कोणत्या स्थानी आहे त्यासंदर्भातील सविस्तर माहिती 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

गट अ (Group A) मध्ये मध्य प्रदेशने सलग तीन सामने जिंकत अव्वल स्थान पटकावले आहे. कर्नाटकनेही पहिल्या तिन्ही लढती जिंकल्या असून नेट रनरेटमध्ये हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. झारखंड आठ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेतील एक लक्षवेधी सामना झारखंड आणि कर्नाटक यांच्यात झाला. या सामन्यात झारखंडने तब्बल ४१२ धावा केल्या. कर्णधार ईशान किशनने अवघ्या ३३ चेंडूत शतक झळकावले. प्रत्युत्तरात कर्नाटकने देवदत्त पडिक्कलच्या शतकाच्या जोरावर विक्रमी धावसंख्या गाठत सामना जिंकला होता.

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...

गट ब (Group B) मध्ये उत्तर प्रदेशने हैदराबाद, चंदीगड आणि बडोदा यांचा पराभव करत १२ गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. तीन सामन्यांनंतर उत्तर प्रदेश हा या गटातील एकमेव अपराजित संघ आहे.

गट क (Group C) मध्ये मुंबई आणि गोवा हे दोन्ही संघ अपराजित आहेत. उत्तम नेट रनरेटमुळे मुंबई अव्वल स्थानी आहे, तर गोवा तीन विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

गट ड (Group D) मध्ये दिल्लीने सलग तीन सामने जिंकत अव्वल स्थान पटकावले आहे. दिल्लीने आंध्र प्रदेश, गुजरात आणि सौराष्ट्र यांचा पराभव करून आपली अपराजित कामगिरी कायम राखली आहे.

प्लेट गटात, बिहार संघाने दमदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. तीन सामन्यांत तीन विजयांसह १२ गुण मिळवत बिहार हा एकमेव अपराजित संघ ठरला आहे.

क्रमांकसंघसामनेविजयपराभवNRRगुण
मध्य प्रदेश (MP)+१.०१७१२
कर्नाटक (KAR)+०.३७०१२
झारखंड (JHA)+१.२६८
त्रिपुरा (TRI)+०.०४४
केरळ (KER)+०.५९४
तामिळनाडू (TN)+०.४९५
राजस्थान (RAJ)−१.५८७
पुद्दुचेरी (PUD)−२.२९७

 

क्रमांकसंघसामनेविजयपराभवNRRगुण
उत्तर प्रदेश (UP)+२.४३३१२
जम्मू-काश्मीर (JAM)+१.४२३
विदर्भ (VID)+०.६३४
बडोदा (BAR)+०.१९८
बंगाल (BEN)−०.३५७
आसाम (ASM)−१.०००
हैदराबाद (HYD)−१.२०२
चंदीगड (CHN)−२.२०७

 

क्रमांकसंघसामनेविजयपराभवNRRगुण
मुंबई (MUM)+२.४२७१२
गोवा (GOA)+०.६९७१२
हिमाचल प्रदेश (HIM)+०.६२७
पंजाब (PUN)+०.५७३
महाराष्ट्र (MAH)+०.९२२
उत्तराखंड (UT)−०.८९१
छत्तीसगड (CHA)−१.५४१
सिक्कीम (SIK)−२.८७६

 

क्रमांकसंघसामनेविजयपराभवNRRगुण
दिल्ली (DEL)+०.६४४१२
ओडिशा (ODS)+१.१४४
रेल्वे (RAI)+०.६१०
हरियाणा (HAR)+०.३७३
गुजरात (GCC)+०.३१५
सौराष्ट्र (SAU)−०.५०८
आंध्र प्रदेश (AP)−०.५४७
सर्व्हिसेस (SER)−२.१४५

 

क्रमांकसंघसामनेविजयपराभवNRRगुण
बिहार (BIH)+३.७१६१२
नागालँड (NAG)+१.६९३
मणिपूर (MAN)+०.०८०
मेघालय (MEG)−०.५७६
अरुणाचल प्रदेश (AP)−२.६०६
मिझोराम (MIZ)−१.९४०

Web Title : विजय हजारे ट्रॉफी 2025-26: अंक तालिका, टीम रैंकिंग और मुख्य बातें।

Web Summary : विजय हजारे ट्रॉफी 2025-26 में स्टार क्रिकेटरों का जलवा। मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, मुंबई, दिल्ली और बिहार जैसे शीर्षकों के साथ, टूर्नामेंट के शुरुआती चरण को ईशान किशन के शतक और रिकॉर्ड चेस जैसे उत्कृष्ट प्रदर्शनों के साथ अपराजित टीमों का नेतृत्व देखा जा रहा है।

Web Title : Vijay Hazare Trophy 2025-26: Points table, team standings, and key highlights.

Web Summary : The Vijay Hazare Trophy 2025-26 sees star cricketers in action. Undefeated teams lead across groups, with standout performances like Ishan Kishan's century and record chases defining the tournament's early stages. Teams like Madhya Pradesh, Uttar Pradesh, Mumbai, Delhi and Bihar are topping the charts.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.