Video : पोलार्डचा आगाऊपणा, अंपायरला No Ball चा निर्णय मागे घेण्यास भाग पाडलं

वर्ल्ड कप आणि भारताविरुद्धच्या मालिकेतील अपयशानंतरही वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळानं जेसन होल्डरकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 04:37 PM2019-11-12T16:37:53+5:302019-11-12T16:38:11+5:30

whatsapp join usJoin us
Vidoe : Cheeky! Kieron Pollard forces umpire to cancel no-ball signal during Afg vs WI 3rd ODI | Video : पोलार्डचा आगाऊपणा, अंपायरला No Ball चा निर्णय मागे घेण्यास भाग पाडलं

Video : पोलार्डचा आगाऊपणा, अंपायरला No Ball चा निर्णय मागे घेण्यास भाग पाडलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वर्ल्ड कप आणि भारताविरुद्धच्या मालिकेतील अपयशानंतरही वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळानं जेसन होल्डरकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेतली. त्यांनी किरॉन पोलार्डकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली. पोलार्डच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजनं नुकताच अफगाणिस्तानविरुद्ध वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2014नंतर वेस्ट इंडिजनं पहिलीच वन डे मालिका जिंकली. विंडीजनं तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली.

पण,या सामन्यात एक अशी घटना घडली की पोलार्ड नेटिझन्सच्या रडारवर आला. लखनौ येथे खेळवण्यात आलेल्या या मालिकेत पोलार्डनं अखेरच्या सामन्यात अंपायरला चक्क निर्णय बदलण्यास भाग पाडले. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची अवस्था 24 षटकांत 4 बाद 97 अशी केली होती. त्यानंतर कर्णधार पोलार्ड गोलंदाजीला आला.

32 वर्षीय पोलार्डनं पहिलाच चेंडू नो बॉल होता. पण, पंचांचा निर्णय एकताच त्यानं चेंडू फेकला नाही. त्यामुळे पंचांना त्यांचा निर्णय बदलावा लागला आणि डेड बॉल जाहीर करण्यात आला. पोलार्डनं असा डाव करून संघाचा एक फ्री हिट वाचवला.

पाहा व्हिडीओ...


पोलार्डनं 5 षटकांत एकही विकेट न घेता 20 धावा दिल्या. रोस्टन चेसनं 44 धावांत सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. अल्झारी जोसेफनं 59 धावांत 2 विकेट घेतल्या. अफगाणिस्ताननं 7 फलंदाज गमावून 249 धावा केल्या. हझरतुल्लाह झझाई, असघर अफघान आणि मोहम्मद नबी यांनी अर्धशतकी भागीदारी केली. प्रत्युत्तरात शे होपनं 145 चेंडूंत नाबाद 109 धावा करताना संघाला विजय मिळवून दिला. 

 

Web Title: Vidoe : Cheeky! Kieron Pollard forces umpire to cancel no-ball signal during Afg vs WI 3rd ODI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.