महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) सध्या रायपूर येथे ( Raipur) रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज ( Road Safety World Series) स्पर्धेत खेळत आहे. भारतीय लिजंड संघाचे नेतृत्व सांभाळताना त्यानं आणि वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) सह पहिल्याच सामन्यात विजय मिळवून दिला. आज इंग्लंड लिजंड संघाविरुद्ध दुसरा सामना रंगणार आहे आणि तत्पूर्वी खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी सचिननं वैद्यकिय अधिकाऱ्यांसोबत प्रँक केले. सचिनची रिअॅक्शन पाहून काही काळ डॉक्टरही घाबरले, परंतु अन्य लोक हसू लागल्यानं तो रिलॅक्स झाला. सचिननं इंस्टाग्रावर व्हिडीओ पोस्ट केला आहे.
सचिननं व्हिडीओवर लिहिले का, मी २०० कसोटी सामने खेळलो आणि ही माझी २७७ वी कोव्हिड चाचणी आहे, वातावरण हलकं करण्यासाठी एक छोटा प्रँक नक्कीच बनतो. आमच्या वैद्यकिय कर्मचाऱ्यांना सलाम.
पहिल्या सामन्यात वीरूनं केलेली जबरदस्त फटकेबाजी
इंडिया लिजंड्स संघानं सलामीच्या सामन्यात बांगलादेश लिजंड्स संघावर १० विकेट्सनं विजय मिळवला होता. त्या सामन्यात वीरूनं ३५ चेंडूंत १० चौकार व ५ षटकार खेचून नाबाद ८० धावा केल्या होत्या. सचिननं २६ चेंडूंत नाबाद ३३ धावा केल्या होत्या.