Video : कोरोनाला हरवण्यासाठी Sachin Tendulkarची बॅटिंग; पाहा 'क्रिकेटचा देव' काय सांगतोय

कोरोना व्हायरसमुळे देशात आतापर्यंत १४८ पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. हा विषाणू आता मोठ्या वेगानं देशभरात परसत असल्याचे दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 12:36 IST2020-03-18T12:35:11+5:302020-03-18T12:36:08+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Video: Sachin Tendulkar batting to beat Corona Virus; Look what the 'God of cricket' is saying svg | Video : कोरोनाला हरवण्यासाठी Sachin Tendulkarची बॅटिंग; पाहा 'क्रिकेटचा देव' काय सांगतोय

Video : कोरोनाला हरवण्यासाठी Sachin Tendulkarची बॅटिंग; पाहा 'क्रिकेटचा देव' काय सांगतोय

कोरोना व्हायरसमुळे देशात आतापर्यंत १४८ पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. हा विषाणू आता मोठ्या वेगानं देशभरात परसत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालय वारंवार नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या आवाहनाला नागरिकही सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. आता आरोग्य मंत्रालयाच्या मदतीला क्रिकेटचा देव मैदानावर उतरला आहे. त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

सचिन म्हणाला,'' आपल्या सर्वांना कोरोनाची भीती सतावत आहे. त्यामुळे आपण स्वतःहून काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि गरज नसल्यास लोकांच्या भेटीगाठी टाळा. कारण हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे झपाट्यानं पसरत आहे. आजारी व्यक्तीपासून लांबच राहा. तुम्हाला स्वतः आजारी असल्यासारखे वाटल्यास हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित संपर्क साधा. २० मिनिटे पाण्यानं हात धुवा. घाबरू नका आणि अफवांवर विश्वास ठेवा. कोरोना व्हायरसला पराभूत केले जाऊ शकते आणि आपण सर्वांनी मिळून ते करायला हवं.''

View this post on Instagram

एक नागरिक के तौर पर हमारी कुछ जिम्मेदारियां हैं। हम कुछ आसान से कदमों का पालन कर कोरोना वायरस (COVID-19) को दूर रख सकते हैं। मैं आपसे अनुरोध करता हूँ कि बुनियादी बातों का ख्याल रखें ताकि हम सभी सुरक्षित रहें। . . As citizens, we have to act responsibly.‬ ‪We could follow simple steps to keep the Corona Virus at bay.‬ ‪It is my request to everyone to follow basic guidelines to try our best to ensure we all stay safe. #IndiaFightsCorona

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

एक छोटी गोष्ट आपल्याला कोरोनापासून दूर ठेवू शकते.... सांगतोय सचिन

अन्य महत्त्वाच्या बातम्या

महेंद्रसिंग धोनीची कारकीर्द संपली?

BCCI नं पर्याय शोधला; IPL 2020 होणार अन् धावांचा पाऊस पडणार, पण कधी?

Web Title: Video: Sachin Tendulkar batting to beat Corona Virus; Look what the 'God of cricket' is saying svg