मुंबई : भारताचा माजी कर्णधार सध्या क्रिकेटपासून लांब आहे. पण सध्याच्या घडीला धोनीचा एक व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे. पण या व्हिडीओखाली लिहिण्यात आलेले आहे की, आपल्या रीस्कवरच तो पाहावा. धोनीचा सध्याचा वायरल झालेला व्हिडीओ हा एका पार्टीमधला आहे. या पार्टीमध्ये बॉलीवूडच्या सुंदर अभिनेत्रीही आल्या होत्या. पण असं घडलंय तरी काय, याचा विचार तुम्ही करत असाल...

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागल्या आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. त्यानं दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश या मालिकेतून विश्रांती घेतली आणि मायदेशात होणाऱ्या विंडीजविरुद्धच्या मालिकेतही त्याचा संघात समावेश नाही. त्यामुळे धोनीच्या मनात नेमकं काय चाललंय, याचा अंदाज कुणालाही बांधता येत नाही. 

Image result for ms dhoni in bollywood party

विंडीज मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका हे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या तीनही मालिकेत धोनीचा संघात समावेश नसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका कार्यक्रमासाठी धोनी बुधवारी मुंबईत आला होता. त्यावेळी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी परतणार असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला,'' जानेवारीपर्यंत मला काही विचारू नका.'' धोनीच्या या उत्तरानं पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

सध्या धोनी क्रिकेटपासून लांब आहे. त्यामुळे त्याचे वेळापत्रक कमी व्यस्त आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या घरी त्याची पत्नी साक्षीने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनाही आमंत्रित करण्यात आले होते. धोनी या पार्टीत मस्ती करण्याच्या मुडमध्ये पाहायला मिळाला.

या पार्टीमध्ये धोनीला काही जणांनी गाणं गाण्याची विनंती केली. धोनीने ती मान्यही केली. धोनीने कोणताही सूर न लावता गाणं गायलं, हे गाणं बेसूर झाल्याचं म्हटले गेलं. त्यामुळे ज्या फिल्म प्रोड्युसरने हा व्हिडीओ पोस्ट केला, त्याच्यापुढे आपल्या रीस्कवरच हा व्हिडीओ पाहावा, असे म्हटले आहे.

Web Title: Video of MS Dhoni's party becoming viral; Look at your risk ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.