Glenn Maxwell Century, MLC 2025: ग्लेन मॅक्सवेलच्या कायम आपल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ओळखला जातो, पण बराच काळापासून त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर मॅक्सवेलला आता सूर गवसला. मेजर लीग क्रिकेट २०२५ मध्ये त्याने एका सामन्यात तब्बल १३ षटकार मारले आणि झंझावाती शतक ठोकले. महत्त्वाची बाब म्हणजे त्याने हे शतक केवळ फक्त ४८ चेंडूंमध्ये ठोकले. आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे, मॅक्सवेलने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन हे धडाकेबाज शतक झळकावले.
शंभरीच्या आत निम्मा संघ बाद
२०२५च्या एमएलसीमध्ये लॉस एंजेलिस नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात वॉशिंग्टन फ्रीडमचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने खऱ्या अर्थाने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्यांनी हे शतक अशा कठीण काळात केले, जेव्हा अर्धा संघ शंभरी गाठण्यापूर्वीच डगआउटमध्ये परतला होता. संघाची बिकट अवस्था झाली असली तरीही मॅक्सवेलने हार मानली नाही. त्याने तुफान फटकेबाजी करत लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघाच्या गोलंदाजांनी मनसोक्त धुलाई केली. त्याच्या दमदार शतकामुळे वॉशिंग्टन फ्रीडमने २० षटकांत ५ गडी गमावून २०८ धावा केल्या.
पहिल्या १५ चेंडूत केवळ ११ धावा, नंतरच्या ३४ चेंडूत तब्बल ९५ धावा
ग्लेन मॅक्सवेलने फॉर्ममध्ये परतताना वादळी शतक झळकावले. डावात एकेकाळी मॅक्सवेल १५ चेंडूत फक्त ११ धावा काढून खेळत होता. पण त्यानंतर त्याने पुढच्या ३४ चेंडूत त्याने उर्वरित ९५ धावा कुटल्या. त्याची एकूण खेळी ४९ चेंडूंची होती, ज्यामध्ये त्याने २१६.३२च्या स्ट्राईक रेट आणि १३ षटकारांसह नाबाद १०६ धावा केल्या. यादरम्यान, त्याने ४८ व्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. ग्लेन मॅक्सवेलने त्याच्या टी२० कारकिर्दीत तब्बल आठव्यांदा शतक झळकावले.
मॅक्सवेल MLC मध्ये कर्णधार म्हणून चमकला
नुकतीच वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या मॅक्सवेलने IPL 2025 मध्ये फारशी चांगली कामगिरी केली नाही. पण, MLC 2025 मध्ये, तो केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे तर संघाचा कर्णधार म्हणूनही आपली कर्तव्ये पार पाडताना दिसतोय आणि जबाबदारीने खेळ करताना दिसतोय.
Web Title: Video Glenn Maxwell superhit blast hit 13 sixes Scored a powerful century in 48 balls MLC 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.