आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील १९ वर्षांखालील भारतीय संघ अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी सज्ज आहे. १५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा असतील. यंदाच्या U19 वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करण्याआधीच १४ वर्षीय बॅटरिनं यंदाचा हंगाम गाजवण्याचे संकेत दिले आहेत. सराव सामन्यात वैभव सूर्यवंशीनं स्कॉटलंडच्या गोलंदाजांची येथेच्छ धुलाई करत U19 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी शड्डू ठोकला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अवघ्या ४ धावांनी हुकलं शतक
स्कॉटलंड अंडर-१९ संघाविरुद्ध वैभव सूर्यवंशीने कर्णधार आयुष म्हात्रेसोबत डावाची सुरुवात केली. पहिल्याच षटकांपासून आक्रमक फलंदाजी करत त्याने गोलंदाजांचे खांदे पाडले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. कर्णधार आयुष म्हात्रे २२ धावा करून बाद झाला. यानंतर वैभवने एरॉन जॉर्जसोबत डाव सावरत धावांचा वेग कायम ठेवला. वैभव सूर्यवंशीने फक्त ५० चेंडूंत ९६ धावा केल्या. या खेळीत त्याच्या बॅटमधून ९ चौकार आणि ७ षटकार आल्याचे पाहायला मिळाले. सराव सामन्यात त्याचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले.
"माझ्या नशिबात जे लिहिलं आहे, ते…" टी-20 संघातून डच्चू दिल्याबद्दल गिल पहिल्यांदाच मनातलं बोलला!
आयुष म्हात्रेचा संघर्ष कायम, एरॉन जॉर्ज आणि विहान मल्होत्राचे अर्धशतक
भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे हा दुखापतीतून सावरुन मैदानात उतरला होता. आशिया कप स्पर्धेतही त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. आता आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्याकडून मोठी अपेक्षा आहे. पण सराव सामन्यात तो फक्त २२ धावांवर बाद झाला. वैभवशिवाय एरॉन जॉर्ज याने ५८ चेंडूत केलेल्या ६१ धावा, विहान मल्होत्राने फॉर्म कायम असल्याचे दाखवून देत केलेली ७७ धावांची खेळी आणि अभिग्यन अभिषेक कुंडूच्या बॅटमधून आलेल्या ५५ धावांच्या खेळीच्या जोरावर सराव सामन्यात भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ८ विकेट्सच्या मोबदल्यात ३७४ धावा केल्या.
वैभव सूर्यवंशी अन् विक्रमांची 'बरसात'
वैभव सूर्यवंशी हा सातत्याने आपल्या फलंदाजीतल धमक दाखवून देताना दिसते. U19 वर्ल्ड कप स्पर्धेआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत वैभव सूर्यवंशीनं कॅप्टन्सीची धूरा सांभाळताना आपल्या फलंदाजीतील धमक दाखवून देताना एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले होते. U19 वर्ल्ड कप स्पर्धेत तो विक्रमांची बरसात करेल, अशी अपेक्षा असेल.