टिकटॉकवर (TikTok) सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. क्रिकेट चाहत्यांना थक्क करणारा हा व्हिडीओ आहे. लॉकडाऊनच्या काळात क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्यामुळे चाहते काहीसे निराश आहेत. पण, टिकटॉकवरील हा व्हिडीओ त्यांना आनंद आणि तितकाच आश्चर्यचकीत करणारा ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्वचितच असा शॉट कोणी मारला आहे. एबी डिव्हिलियर्सला Mr 360 असे संबोधले जात असले तरी त्यालाही असा षटकार खेचणे अवघडच दिसत आहे. अतरंगी षटकाराचा हा व्हिडीओ आतापर्यंत 75 लाख लोखांनी पाहिला आहे.
गल्ली क्रिकेटचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये मुलग्याने मारलेला शॉट काहीतरी भलताच आहे. त्यानं मागे वळून षटकार खेचला आहे. त्याचा हा शॉट पाहून त्याच्याबरोबर खेळणारे देखील आश्चर्यचकित झाले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. गोलंदाजानं फलंदाजाच्या पायाजवळ बॉल टाकला. मात्र त्यावर फटका मारण्यासाठी फलंदाज मागे वळून जोरदार छक्का मारतो. हा व्हिडीओ आतापर्यंत 7.5 मिलियन पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. तर 8 लाखापेक्षा जास्त लाइक्स या व्हिडीओला मिळाले आहेत.