भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुल सध्या राष्ट्रीय संघापासून दूर आहे. पण, विजय हजारे चषक वन डे स्पर्धेत तो सातत्यानं धावा करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील निराशाजनक कामगिरीमुळे त्याला कसोटी संघातून डच्चू देण्यात आलेला आहे. क्रिकेटच्या मैदानाबरोबर लोकेश राहुल सोशल मीडियावरही अधिक चर्चेत असतो. सध्या राष्ट्रीय संघाचा सदस्य नसल्यानं त्याच्याकडे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहण्यासाठी वेळच वेळ आहे. त्यानं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. त्यावरून दोन अभिनेंत्रींमध्ये कलगीतुरा रंगला आणि त्यामुळे पुन्हा एकदा राहुल चर्चेत आला आहे.
![]()
दोन अभिनेंत्रींमधला हा वाद टोकाचा नाही, तर हा हसतखेळत रंगलेला कलगीतुरा आहे. शेअर केलेल्या फोटोत राहुलनं गॉगल्स घातलेला आहे. त्यावर आथिया शेट्टीनं प्रतिक्रिया दिली की, हा गॉगल मी घेणार. त्यावर आकांक्षा रंजन कपूरनं आपण दोघी गॉगल शेअर करू असे म्हटले. आकांक्षा एक मॉडल आहे आणि ती आलिया भटची चांगली मैत्रीण आहे.
'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...
कॉफी विथ करण, या कार्यक्रमामध्ये अश्लील वक्तव्य केल्यानंतर भारताचा फलंदाज लोकेश राहुल चांगलाच ट्रोल झाला होता. पण आता त्याचे 'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर डेटिंग सुरु असल्याचे वृत्त पसरले होते. पण हे वृत्त खरे आहे का, जाणून घ्या...
राहुल आणि बॉलीवूडमधील अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूरबरोबर अफेअर असल्याची चर्चा होती. आकांक्षा ही आलिया भटची चांगली मैत्रिण आहे. आकांक्षाने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये दोघांची जेवढी जवळीक आहे, ते पाहता त्यांच्यामध्ये अफेअर सुरु आहे, असे चाहते म्हणत होते. पण आता तर 'जन्नत' फेममधील अभिनेत्रीबरोबर राहुलचे नाव जोडले जात आहे.
सध्याच्या घडीला राहुल चांगल्या फॉर्ममध्ये नाही. भारतीय संघातून राहुलला बाहेर काढले आहे. 'जन्नत' फेम सोनल चौहानने राहुलला एक संदेश पाठवत आपली मनातील इच्छा बोलून दाखवली होती. राहुल हा पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येईल आणि संघात स्थान पटकावेल, असे सोनलने म्हटले होते. यानंतर राहुल आणि सोनल यांच्यामध्ये अफेअर सुरु असून ते दोघे डेटिंग करत असल्याचे म्हटले जाऊ लागले.
सोनलने मात्र राहुलबरोबरचे नाते उलगडले नाही. या नात्यावर तिने भाष्य करणे टाळले. सोनल म्हणाली की, " राहुल हा एक चांगला माणूस आहे. त्याचबोरबर तो एक गुणवान क्रिकेटपटू आहे. पण माझ्या आणि राहुलमध्ये तुम्ही जसे समजता तसे काहीही नाही."