आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2012मध्ये मोहम्मद इरफाननं पाकिस्तान संघाकडून पदार्पण करताना सर्वांचे लक्ष वेधले होते. 7.1 फुटाचा हा खेळाडू जगातील सर्वात उंच खेळाडू ठरला होता, परंतु त्यापेक्षाही उंच खेळाडू आता क्रिकेट खेळताना पाहायला मिळणार आहे. पाकिस्तान सुपर लीगमधील (पीएसएल) लाहोर कलंदर्स संघाकडून हा खेळाडू खेळणार आहे. मुहम्मद मुदस्सर असे या खेळाडूचे नाव आहे आणि त्याच्याशी बोलताना खरचं एखाद्याची मान मोडेल.. 7.5 फुट उंचीचा हा फिरकीपटू सध्या पाकिस्तानात चर्चेचा विषय ठरला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या 21 वर्षीय मुदस्सर क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी वर्षभर ट्रेननं प्रवास करत होता.