भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड

R Ashwin fined, angry video, TNPL 2025: अश्निनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:06 IST2025-06-10T12:04:43+5:302025-06-10T12:06:20+5:30

whatsapp join usJoin us
TNPL 2025 R Ashwin Pays Big Price fined For Angry Act Handed Hefty Penalty | भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड

भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

R Ashwin fined, angry video, TNPL 2025: तामिळनाडू प्रीमियर लीग २०२५ मध्ये आयड्रीम तिरुप्पुर तमिझान्स आणि डिंडीगुल ड्रॅगन्स यांच्यात रविवारी सामना खेळला गेला. या सामन्यात डिंडीगुल ड्रॅगन्सचा कर्णधार रविचंद्रन अश्विन महिला अंपायवर भडकल्याचे पाहायला मिळाले. साई किशोरच्या चेंडूवर LBW आऊट दिल्यानंतर अश्विन मैदानातील महिला अंपायरजवळ गेला आणि त्यांच्याशी वाद घालू लागला. त्यानंतर त्याने पॅव्हेलियनकडे जाताना स्वत: पॅडवर बॅट मारली. अश्निनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. अंपायरवर चिडणे त्याला भलतेच महागात पडले.

नेमके काय घडले होते?

डिंडीगुल ड्रॅगन्सच्या डावातील पाचव्या षटकात साई किशोरच्या गोलंदाजीवर अश्विनने स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडू त्याच्या पॅडला लागला. यानंतर साई किशोर अपील केली आणि अंपायर आऊट दिले. चेंडू लेग-स्टंपच्या बाहेर टप्पा पडत असतानाही अंपायरने आऊट दिल्याने अश्निन नाराज झाला. त्याने अंपायरला पटवून देण्याचा प्रयत्न केला की, हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडला आहे. मात्र, तरीही पंचांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही आणि त्या पुढे चालत निघून गेल्या. यामुळे अश्निन भडकला आणि स्वत:च्या पॅटवर बॅट मारली.

पंचांनी बाद दिल्यावर अश्विनचा संताप-

बॅट पॅडवर आपटली, हँडग्लोव्ह्ज फेकले...

अश्विनवर दंडात्मक कारवाई

अश्विनने अशा पद्धतीची वर्तणूक केल्यानंतर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याला मानधनाच्या एकूण ३० टक्के रक्कम दंड म्हणून ठोठवण्यात आली. TNPL च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अश्विनला त्याच्या मैदानावरील वाईट वर्तणुकीसाठी १० टक्के तर क्रिकेट साधनांचा चुकीचा वापर करण्यासाठी २० टक्के दंड ठोठवण्यात आला.

दरम्यान, या सामन्यात आयड्रीम तिरुप्पुर तमिझान्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना डिंडीगुल ड्रॅगन्सचा संपूर्ण संघ  १६.२ षटकांत ९३ धावांवर ऑलआऊट झाला. डिंडीगुल ड्रॅगन्सकडून शिवम सिंगने ३० शिवम सिंगने सर्वाधिक ३० धावा केल्या. तर, अश्विन आणि आरके जयंतने प्रत्येकी १८-१८ धावांचे योगदान दिले. तमिझान्सकडून गोलंदाजी करताना एसाकिमुथुने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, साई किशोरने दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात तिरुप्पुर तमिझान्सने अवघ्या ११.५ षटकांत हा सामना जिंकला. यष्टीरक्षक तुषार रहेजाने ३९ चेंडूत ६५ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त अमितने १३ आणि राधाकृष्णाने १४ धावा केल्या.

Web Title: TNPL 2025 R Ashwin Pays Big Price fined For Angry Act Handed Hefty Penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.