Time should be given to Rishabh Pant - Ganguly | रिषभ पंतला वेळ द्यायला हवा - गांगुली
रिषभ पंतला वेळ द्यायला हवा - गांगुली

कोलकाता : यष्टीरक्षणात वारंवार चुका करणाऱ्या रिषभ पंतला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी पाठिंबा दर्शवला असून, ‘त्याला अजून वेळ द्यायला हवा. तो नक्कीच चांगली कामगिरी करेल,’ असे त्यांनी सांगितले. बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत पंत कामगिरी खूपच खालावली आहे. याबाबत धोनीची कमतरता जाणवते का? असे विचारल्यावर गांगुली म्हणाले, ‘पंत चांगला खेळाडू आहे. तो नक्कीच चांगली कामगिरी करेल. त्याला थोडा वेळ द्यायला हवा.’ बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात २६ चेंडूत २७ धावा करणाºया पंतने यष्टीरक्षण व डीआरएसचा निर्णय घेताना केलेल्या चुकांचा फटका भारताला बसला. दुसºया सामन्यात त्याने यष्टीच्या पुढे चेंडू पकडून चूक केली. मात्र त्याने धावबाद व यष्टीचीत करत आपल्यावरील दबाव कमी केला.

पंतला स्वत:च्या उणिवा लक्षात घ्याव्या लागतील - संगकारा
रिषभ पंतला आपल्या उणिवा लक्षात घ्याव्या लागतील व त्याला त्याचा खेळ स्वच्छंदपणे खेळू द्यायला हवे,’ असे मत श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकाराने व्यक्त केले आहे. पंत फलंदाजी आणि यष्टिरक्षणात आपला प्रभाव पाडण्यात अपयशी ठरत आहे. त्याच्यातील गमावलेला आत्मविश्वास पुन्हा येण्यासाठी कुमार संगकाराने त्याला फलंदाजी आणि यष्टिरक्षण या दोन्ही विभागांत सहज राहण्याचा सल्ला दिला आहे. तो म्हणाला, ‘पंतसाठी स्वत:ला कम्फर्टेबल ठेवणे महत्त्वाचे आहे व त्याला आपल्या उणिवा लक्षात घ्याव्या लागतील. फलंदाजीत त्याच्यावरील दबाव कमी करुन त्याला नैसर्गिक खेळ खेळू द्यावे. यष्टिरक्षक म्हणून तुम्हाला अचूक व सावध राहावे लागेल. त्यामुळे त्याला आत्मविश्वास मिळेल व तो कर्णधाराला डीआरएस निकालात मदत करण्यास चांगल्या स्थितीत असेल.’स्
 

Web Title: Time should be given to Rishabh Pant - Ganguly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.