पाकमध्ये कसोटी मालिका, पुढील महिन्यात श्रीलंका संघाचा दौरा

श्रीलंका संघाने दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास होकार कळविल्याने जवळपास दहा वर्षांहून अधिक काळानंतर दहशतवादाच्या सावटाखाली असलेल्या या देशात कसोटी मालिकेचे आयोजन होण्याची आशा पल्लवित झाली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 04:17 AM2019-11-15T04:17:57+5:302019-11-15T04:18:01+5:30

whatsapp join usJoin us
Test Series in Pakistan! | पाकमध्ये कसोटी मालिका, पुढील महिन्यात श्रीलंका संघाचा दौरा

पाकमध्ये कसोटी मालिका, पुढील महिन्यात श्रीलंका संघाचा दौरा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लाहोर : श्रीलंका संघाने दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास होकार कळविल्याने जवळपास दहा वर्षांहून अधिक काळानंतर दहशतवादाच्या सावटाखाली असलेल्या या देशात कसोटी मालिकेचे आयोजन होण्याची आशा पल्लवित झाली आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असेल.
आगामी मालिकेतील पहिला कसोटी सामना ११ ते १५ डिसेंबर या कालावधीत रावळपिंडी येथे खेळविण्यात येईल. तसेच दुसरा सामना १९ ते २३ डिसेंबर दरम्यान कराची येथे पार पडले. श्रीलंकेच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार दिमूथ करुणारत्ने आणि टी२० संघाचा कर्णधार लसिथ मलिंगासह दहा आघाडीच्या खेळाडूंनी सुरक्षेचे कारण देत पाकिस्तान दौºयातून माघार घेतल्यानंतरही यंदा सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात श्रीलंकेने पाकिसानमध्ये एकदिवसीय तसेच टी२० मालिका खेळली होती.
पीसीबीचे आंतरराष्टÑीय क्रिकेट संचालक झाकीर खान म्हणाले, ‘पाकिस्तान क्रिकेट तसेच जगातील अन्य कुठल्याही देशाप्रमाणे सुरक्षित राष्टÑ या प्रतिष्ठेप्रती ही गोड बातमी आहे. कसोटी मालिकेसाठी संघ पाठवित असल्याबद्दल आम्ही श्रीलंका क्रिकेटचे आभारी आहोत.’
श्रीलंका संघाच्या या दौºयामुळे आंतरराष्टÑीय क्रिकेटचे नियमितपणे येथे आयोजन करण्यास बळ मिळणार असून त्यादृष्टीने ही मालिका मोलाची असल्याचे झाकीर खान म्हणाले. २००९ मध्ये श्रीलंका संघानेच पाकिस्तानमध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यावेळी लाहोर कसोटी सामन्यादरम्यान दहशतवाद्यांनी श्रीलंका संघाच्या बसवर हल्ला केला होता. या घटनेपासून आंतरराष्टÑीय संघांनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास सातत्याने नकार दिला आहे. (वृत्तसंस्था)

 

 

Web Title: Test Series in Pakistan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.