Technique and mental balance are the most important in the test | कसोटीमध्ये तंत्र व मानसिक संतुलन सर्वांत महत्त्वाचे

कसोटीमध्ये तंत्र व मानसिक संतुलन सर्वांत महत्त्वाचे

- सौरव गांगुली लिहितात...

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुणे येथे गुरुवारपासून होणाऱ्या दुसºया कसोटी सामन्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. पहिली म्हणजे खेळपट्टीवर हिरवळ असेल आणि दुसरी म्हणजे नाणेफेकीचा कौल. उपखंडात नाणेफेक जिंकणे पाहुण्या संघासाठी महत्त्वाचे असते, तर यजमान संघासाठी त्याला विशेष महत्त्व नसते.
पहिल्या डावात शानदार फलंदाजी करणारा संघ दुसºया डावात कसा गडगडला, याचे अनेक क्रिकेटपटू व जाणकारांना आश्चर्य वाटले असेल. खरे पाहता भारतीय खेळपट्ट्यांवर परिस्थिती झपाट्याने बदलते आणि चौथ्या व पाचव्या दिवसापर्यंत आव्हान कायम राखण्यासाठी उंचावलेल्या मनोधैर्यासह तंत्रही अचूक असणे आवश्यक असते. तंत्र महत्त्वाचे असतेच, पण सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे मानसिक कणखरता असते. उसळी घेणाºया व फिरकी घेणाºया चेंडूवर बारीक लक्ष ठेवावे लागते. पाचव्या दिवश्ी प्रत्येक चेंडू वेगाने वळत नाही, पण एक चेंडू वळला तर फलंदाजाला त्यानंतरचा चेंडू खेळताना अडचण भासते. जर पाहुणा संघ हे आव्हान स्वीकारण्यास अपयशी ठरला तर त्यांच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरणे कठिण होते.
मी माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत द. आफ्रिका संघाला कधी तीन फिरकीपटू व दोन वेगवान गोलंदाजांसह खेळताना बघितले नाही. खरे सांगायचे झाल्यास संघात केवळ एकच वेगवान गोलंदाज आहे. वर्नोन फिलँडर भारतीय खेळपट्ट्यांवर संथ होतो. संघ व्यवस्थापनाने एनगिडीचा अंतिम ११ खेळाडूंत समावेश करायला हवा. त्यामुळे रिव्हर्स स्विंगसाठी मदत मिळेल. खेळपट्टीवर हिरवळ बघितल्यानंतर कर्णधार डुप्लेसिसही असा विचार करू शकतो.
भारतीय संघात बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे नजर पुन्हा एकदा रोहितच्या कामगिरीवर केंद्रित राहील. त्याने कसोटीमध्ये सलामीवीर म्हणून पदार्पणात यश मिळवले आहे. फलंदाजीसाठी सर्वांत चांगली जागा म्हणजे आघाडीची फळी असते. त्यावेळी चेंडू नवा व टणक असतो. पहिल्या कसोटीत शानदार कामगिरी केल्याने रोहित समाधानी असेल. त्याच्यासाठी न्यूझीलंडविरुद्धची पहिली कसोटीही निर्णायक राहील. जर तो तेथेही यशस्वी ठरला तर तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये विश्वस्तरीय फलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी होईल. (गेमप्लॅन)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title:  Technique and mental balance are the most important in the test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.