टीम इंडियाची कामगिरी ऐतिहासिक, रोमहर्षक, अविस्मरणीय...

याआधी भारताने २०१८ ला देखील असाच मालिका विजय मिळविला होता. मात्र यंदाचा हा विजय ऐतिहासिक, रोमहर्षक, अविस्मरणीय ठरला.  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 04:32 AM2021-01-21T04:32:30+5:302021-01-21T06:58:14+5:30

whatsapp join usJoin us
Team India's performance is historic, thrilling, unforgettable ... | टीम इंडियाची कामगिरी ऐतिहासिक, रोमहर्षक, अविस्मरणीय...

टीम इंडियाची कामगिरी ऐतिहासिक, रोमहर्षक, अविस्मरणीय...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर 

 भारताने ऑस्ट्रेलियावर २-१ ने मालिका विजय नोंदविला. याआधी २०१८ ला देखील असाच मालिका विजय मिळविला होता. मात्र यंदाचा हा विजय ऐतिहासिक, रोमहर्षक, अविस्मरणीय ठरला.  

विराट कोहली (५/१०) :  ॲडिलेडची पहिली कसोटी खेळून मायदेशी परतला. पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली मात्र दुसऱ्या डावात नामुष्की टाळण्यात अपयशी. सहकाऱ्यांमध्ये आक्रमकता आणली पण ऐतिहासिक कामगिरीचा साक्षीदार होऊ शकला नाही.

 अजिंक्य रहाणे (८.५/१०) : अत्यंत वाईट अवस्थेतून संघाला बाहेर कढण्याचे आव्हान लीलया पेलले. मेलबोर्नमध्ये शतक ठोकून  विश्वास कायम केला. चतुरस्र नेतृत्व क्षमतेच्या जोरावर ऑस्ट्रेलियात कामगिरीची पताका उंचावली.

रोहित शर्मा (५/१०) : पहिल्या दोन सामन्यात बाहेर राहिलेला हा फलंदाज धडाकेबाज सुरुवात करूनही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. स्लिपमध्ये मात्र चांगली कामगिरी.

 शुभमन गिल (८/१०) : आक्रमक आणि तांत्रिक कौशल्यात भक्कम. अनुभव नसताना आत्मविश्वासासह फलंदाजी. वेगवान माऱ्याला समर्थपणे तोंड दिले. ब्रिस्बेनमध्ये अखेरच्या दिवशी ९१ धावा ठोकून विजयाचा पाया रचला.

 चेतेश्वर पुजारा (७/१०) : २०१८ च्या मालिकेत ठोकलेल्या धावांची पुनरावृत्ती करण्यात अपयश. अभेद्य भिंतीप्रमाणे  खेळपट्टीवर स्थिरावला, अन्यथा तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत संघाला पराभव पत्करावा लागला असता.

 मयांक अग्रवाल (३/१०) : २०१८ चा हिरो यंदा कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात अपयशी. वेग, लेट स्विंग आणि बाऊन्सर्सपुढे अपयशी ठरल्याने संघात स्थान मिळविण्यासाठी संघर्ष.

 ऋषभ पंत (८.५/१०) : यष्टिरक्षणात गचाळपणा केला पण फलंदाजीमुळे प्रशंसेस पात्र ठरला. ब्रिस्बेन कसोटी विजयाचा हिरो. यष्टिरक्षणात काही सुधारणा केल्यास गिलख्रिस्टसारखा मॅचविनर बनू शकतो.

 हनुमा विहारी (६/१०) : ड्रॉ झालेल्या सिडनी कसोटीचा हिरो. संयम, मानसिक कणखरतेमुळे जखमी असताना संयमी फलंदाजी केली. क्षमतेमुळे अनेकांच्या प्रशंसेस पात्र ठरला.

 रवींद्र जडेजा (७.५/१०) : दोन सामने खेळण्याची संधी मिळाली पण दम दाखविला. अर्धशतकाच्या बळावर संघाला मेलबोर्न कसोटी जिंकून दिली. सिडनीत अंगठ्याला दुखापत होण्याआधी स्टीव्ह स्मिथला अलगद धावबाद केले.

रविचंद्रन अश्विन (८.५/१०) : आघाडीच्या फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात ओढले. मेलबोर्न कसोटीत कामगिरीच्या बळावर टीकाकारांची बोलती बंद केली. विहारीसह संयमी खेळी करीत सिडनीत पराभव टाळला.

वॉशिंग्टन सुंदर (८/१०) : जडेजा आणि अश्विन जखमी झाल्यामुळे संघात स्थान. कसोटी संघाचा भाग नसतानाही अष्टपैलू, संयमी आणि आक्रमक खेळाचा परिचय घडविला.

शार्दूल ठाकूर (८/१०) : कसोटी संघात स्थान मिळाले नव्हते. शमी आणि उमेश यादव यांच्या अनुपस्थितीचा लाभ. अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख निर्माण केली.

 जसप्रीत बुमराह (८/१०) : वेगवान गोलंदाजीचा आधारस्तंभ. ब्रिस्बेन कसोटीतून बाहेर होण्याआधी वेग, अचूक दिशा आणि लय या बळावर चुका करण्यास भाग पाडले.

 मोहम्मद सिराज (८/१०) : जखमी शमीच्या जागी स्थान मिळाले. आक्रमकता, वेग आणि  अचूक टप्पा या बळावर फलंदाजांना चकविले. वर्णद्वेषी टीकेला सामोरा गेला. ब्रिस्बेन कसोटीत पाच गडी बाद केले.

 नवदीप सैनी (४/१०) : योग्य टप्प्यावर चेंडू टाकण्याचे तंत्र शिकावे लागेल. चौथ्या कसोटीत फिटनेसची समस्या.

 टी. नटराजन (५/१०) : नेट गोलंदाज म्हणून आल्यानंतर तिन्ही प्रकारात खेळण्याचा आगळावेगळा विक्रम केला. २९ वर्षांच्या या गोलंदाजामध्ये चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे. वेग वाढविल्यास धोकादायक गोलंदाज बनू शकतो.

 उमेश यादव (५/१०) : पहिल्या कसोटीत वेगवान आणि भेदक मारा केला. दुसऱ्या कसोटीत जखमी झाला. सिराज, सैनी आणि नटराजनच्या यशामुळे पुनरागमन कठीण झाले आहे.
 
पृथ्वी शॉ (२/१०) : दोन कसोटीत संधी मिळाली मात्र कमकुवत तंत्र आणि चुकीच्या फटक्यांमुळे अपयशी. कसोटी संघात पुनरागमन सोपे नाही.

Web Title: Team India's performance is historic, thrilling, unforgettable ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.