इंग्लंडमध्ये 2019साली पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. वर्ल्ड कप विजयाचे प्रबळ दावेदार म्हणून टीम इंडिया लंडनमध्ये दाखल झाली होती आणि त्यांच्या प्रत्येक सामन्याला तुफान गर्दी जमली होती. भारतीय चाहते आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर आवर्जुन उभे होते आणि याच चाहत्यांमध्ये 87 वर्षीय चारुलता पटेल यांचा समावेश होता. वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धचा सामना पाहण्यासाठी चारुतला या स्टेडियमवर आल्या होत्या आणि त्यावेळी कर्णधार विराट कोहलीसह अन्य खेळाडूंनीही त्यांची भेट घेतली होती.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 87 वर्षीय चारुलता पटेल या आज्जीबाईंनी सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यांचा उत्साह पाहून  कोहली आणि रोहित शर्मा यांनाही त्यांची भेट घेण्याची उत्सुकता झाली होती. त्यामुळेच त्या सामन्यानंतर त्यांनी आज्जीबाईंची भेट घेतली आणि त्यांचा आशीर्वादही घेतला होता. त्यावेळी कोहलीनं चारुलता पटेल यांना पुढील सामन्याचं तिकीट देण्याचं कबुल केलं होतं आणि कोहलीनं शब्द पाळला. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीचं तिकीट कोहलीनं आज्जीबाईंना दिलं. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच उत्साहात आज्जीबाई टीम इंडियाला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचल्या होत्या.

त्या सामन्यानंतर सोशल मीडियावर चारुलता पटेल यांचीच चर्चा रंगली होती. त्यांचं क्रिकेटप्रती प्रेम पाहून चाहतेच नव्हे तर विराट व रोहित शर्माही अवाक् झाले होते. पण, या सुपरफॅन आजीचं निधन झाल्याची मन पिळवटणारी माहिती समोर आली आहे. चारुलता यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या नातीनं ही बातमी दिली. 

त्यावर लिहिले की,''तुम्हाला कळवण्यात दुःख होतं की, आमच्या आजीनं 13 जानेवारी सायंकाळी 5.30 वाजता अखेरचा श्वास घेतला.'' 


87 वर्षीय चारुलता यांनी विराट कोहलीसाठी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी एक नोट लिहीली होती. 

टीम इंडियानं वाहीली श्रद्धांजली

 

Read in English

Web Title: Team India’s 87-year Old Superfan Charulata Patel Passes Away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.