टीम इंडियाचा यष्टिरक्षक पुन्हा होणार बाप; दुसऱ्या पाहुण्याचं करणार लवकरच स्वागत

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती, बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची निवड आदी विषय चर्चेत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 09:57 AM2019-10-26T09:57:54+5:302019-10-26T09:58:19+5:30

whatsapp join usJoin us
Team India wicketkeeper Wriddhiman Saha to become father for second time | टीम इंडियाचा यष्टिरक्षक पुन्हा होणार बाप; दुसऱ्या पाहुण्याचं करणार लवकरच स्वागत

टीम इंडियाचा यष्टिरक्षक पुन्हा होणार बाप; दुसऱ्या पाहुण्याचं करणार लवकरच स्वागत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती, बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची निवड आदी विषय चर्चेत आहेत. पण, शुक्रवारी भारताच्या यष्टिरक्षकानं सर्वांना एक गुड न्यूज सांगितली आहे. भारताचा यष्टिरक्षक वृद्धीमान साहा दुसऱ्या मुलाच्या स्वागतासाठी आतुर झाला आहे. साहानं सोशल मीडियावरून त्यानं ही गुड न्यूज दिली. 35व्या वाढदिवशी साहानं ही गोड बातमी दिली, तो म्हणाला,''हा वाढदिवस खुप खास आहे. नव्या सदस्याच्या स्वागतासाठी आम्ही सर्व आतुर आहोत. आमच्याकडे आणखी एक पाहुणा येणार आहे. तुमच्या शुभेच्छा पाठिशी असुद्या.''


धोनीच्या निवृत्तीनंतर कसोटी संघात यष्टिरक्षक म्हणून  साहाच पहिली पसंती होता. त्याला काही काळ दुखापतीनंतर विश्रांती घ्यावी लागली. पण, नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून त्यानं कमबॅक केलं. त्यानं यष्टिंमागे कमालीची कामगिरी केली. त्यामुळे आगामी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्यालाच संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.  

वृद्धीमान साहा जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षक; विश्वास बसत नाही, तर आकडेवारी पाहा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत साहानं अफलातून कामगिरी केली.  या कामगिरीनंतर साहा जगातिल सर्वोत्तम यष्टिरक्षक बनला आहे. कसा? चला जाणून घेऊया...

2017नंतर कसोटी क्रिकेटमध्ये जलदगती गोलंदाजांच्या गोलंदाजीवर यशस्वी झेल टीपणाऱ्या यष्टिरक्षकांमध्ये साहानं आघाडी घेतली आहे. त्याची झेल पकडण्याची अचुकता ही 96.9% इतकी आहे. म्हणजेच अन्य यष्टिरक्षकांपेक्षा अधिक.  त्यानंतर श्रीलंकेचा निरोशन डिकवेला ( 95.5%), इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो ( 95.2%), ऑस्ट्रेलियाचा टीम पेन ( 93.9%) आणि न्यूझीलंडचा बीजे वॉटलिंग ( 92.8%) हे अव्वल पाचात येतात. त्यापाठोपाठ पाकिस्तानचा सर्फराज अहमद ( 92.3%), दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक ( 92.1%), मॅथ्यू वेड ( 91.6%), भारताचा रिषभ पंत ( 91.6%), बांगलादेशचा लिटन दास ( 90.9%) आणि वेस्ट इंडिजचा शेन डॉर्वीच ( 89.9%) यांचा क्रमांक येतो. 

Web Title: Team India wicketkeeper Wriddhiman Saha to become father for second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.