Team India coach Ravi Shastri visited Sree Padmanabhaswamy Temple, netizens trolled him | रवी शास्त्री झाले ट्रोल... देव दर्शनाला लागलात पण, या गोष्टीचं काय?
रवी शास्त्री झाले ट्रोल... देव दर्शनाला लागलात पण, या गोष्टीचं काय?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील तिसरा सामना बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. वेस्ट इंडिजनं दुसरा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघ मालिका विजयासाठी दमदार खेळ करण्यासाठी आतुर आहेत. तिरूअनंतपूरम येथील सामन्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी तेथील पद्मनाभस्वामी मंदीरात दर्शन घेतले. मंगळवारी त्यांनी देव दर्शनाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यावरून नेटिझन्सनी त्यांना ट्रोक करण्याची संधी दवडली नाही.

यापूर्वी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील डे नाइट कसोटीपूर्वी शास्त्रींनी उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात होम हवन केले होते. तेव्हाही ते ट्रोल झाले होते.


यावेळीही नेटिझन्सनी संधी दवडली नाही. 

Web Title: Team India coach Ravi Shastri visited Sree Padmanabhaswamy Temple, netizens trolled him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.