भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज टी नटराजन ( T Natarajan) याला अखेर त्याच्या मुलीची भेट घेता आली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना नटराजनच्या घरी नन्ही परीचं आगमन झालं. पण, राष्ट्रीय कर्तव्यावर असल्यामुळे नटराजनला संघासोबत राहावं लागलं. नटराजनसाठी ऑस्ट्रेलिया दौरा हा संस्मरणीय ठरला. ट्वेंटी-20, वन डे आणि कसोटी संघात त्यानं या एका दौऱ्यातच पदार्पण केलं. एकाच दौऱ्यात तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. मायदेशात परतल्यानंतर नटराजननं मुलीची भेट घेतली आणि सोशल मीडियावर त्यानं मुलगी व पत्नीसोबतचा फोटो पोस्ट करून आनंद व्यक्त केला. पण, त्याला आता टीकेला सामोरं जावं लागत आहे. शाब्बास शार्दूल! क्रिकेटवरील प्रेमासाठी कारनं केला ७०० किलोमीटर प्रवास; जाणून घ्या कारण
''तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्ट आहे. आमच्या आयुष्यात आनंद असण्यामागे तू कारण आहेस. पालक म्हणून आमची निवड केल्याबद्दल तुझे आभार लाडू. खूप सारं प्रेम,'' असं त्यानं ट्विटखाली लिहिलं. त्यानं हे ट्विट इंग्रजीतून केल्यामुळे त्याच्यावर टीका होऊ लागली आहे . त्यानं त्याच्या मुलीचं नान हन्विका असं ठेवलं आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाल्याने नटराजन मुलीच्या जन्मावेळी उपस्थित राहू शकला नव्हता. फक्त ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी निवड झालेल्या नटराजनला वन डे आणि कसोटी सामन्यांमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. ट्वेंटी-20मधील पहिल्याच सामन्यात नटराजनने तीन विकेट्स घेतल्या होत्या. गाबा येथील ऐतिहासिक कसोटी विजयामध्ये नटराजननेही मोलाची कामगिरी केली. पहिल्या डावात नटराजनने ऑस्ट्रेलियाचे तीन विकेट्स घेतल्या होत्या.