Steven Smith and David Warner the most expensive player | स्मिथ, वॉर्नर ठरले सगळ्यात महाग खेळाडू
स्मिथ, वॉर्नर ठरले सगळ्यात महाग खेळाडू

लंडन : ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे जुलैमध्ये होणाऱ्या ‘द हंड्रेड लीग’च्या सुरुवातीच्या ड्राफ्टमध्ये सर्वात महाग खेळाडू ठरले. स्मिथ आणि वॉर्नर यांची किमत १ लाख २५ हजार पाऊंड आहे.

Image result for smith and warner

ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, श्रीलंकेचा लसीथ मलिंगा, दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा हेही याच श्रेणीत आहेत. पहिला लिलाव रविवारी होईल. पुरुषांच्या गटात २३९ परदेशी खेळाडूंसह ५७० खेळाडू सहभागी होतील. आठ संघ १०० चेंडूंच्या या पहिल्या स्पर्धेत सहभागी होतील. ही स्पर्धा १७ जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यान होईल.


Web Title: Steven Smith and David Warner the most expensive player
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.