भारताविरुद्ध मालिकेआधी श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी

श्रीलंका बोर्डाने खेळाडूंच्या उत्पन्नाचे आकलन करण्यासाठी नवी ग्रेडिंग प्रणाली लागू केली. या प्राणलीनुसार उत्पन्नाचे आकलन होणे खेळाडूंना मान्य नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 07:55 AM2021-05-18T07:55:14+5:302021-05-18T07:56:07+5:30

whatsapp join usJoin us
Sri Lankan players threaten to retire before series against India | भारताविरुद्ध मालिकेआधी श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी

भारताविरुद्ध मालिकेआधी श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिली निवृत्तीची धमकी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो : भारत आणि श्रीलंकेदरम्यान आगामी जुलै महिन्यात मर्यादित षटकांची मालिका प्रस्तावित आहे. या मालिकेआधी श्रीलंकेच्या खेळाडूंनी आपल्या क्रिकेट बोर्डाला नव्या ग्रेडिंग प्रणालीवरून अल्टिमेटम दिला. मागण्या पूर्ण न झाल्यास निवृत्त होण्याची धमकी देण्यात आल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. भारताचाश्रीलंका दौरा १३ जुलैपासून सुरू होईल. तीन वन-डे आणि पाच टी-२० सामने खेळले जातील.

श्रीलंका बोर्डाने खेळाडूंच्या उत्पन्नाचे आकलन करण्यासाठी नवी ग्रेडिंग प्रणाली लागू केली. या प्राणलीनुसार उत्पन्नाचे आकलन होणे खेळाडूंना मान्य नाही. संडे टाइम्सच्या वृत्तानुसार, श्रीलंका क्रिकेट कॉन्ट्रॅक्स निगोशिएशन्समध्ये खेळाडूंचे प्रतिनिधी निशान यांनी खेळाडूंची मागणी बोर्डाला कळविली आहे. यानुसार गुण देणाऱ्या नव्या प्रणालीत खेळाडूंना भागीदार बनविण्यात यावे,’ असे सर्व खेळाडूंना वाटते.

याप्रकरणी श्रीलंका क्रिकेटच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य ॲश्ले डिसिल्व्हा म्हणाले, ‘खेळाडूंच्या मागणीनुसार करारात बदल करण्यात आले आहेत. आता आम्ही कराराला अंतिम स्वरूप दिल्यानंतर वरिष्ठ खेळाडूंसोबत चर्चा करू. नव्या करारावर सही करणार नाही, असे अद्याप एकाही खेळाडूने म्हटलेले नाही.’

काय आहे खेळाडूंची मागणी...?
श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंची मागणी अशी की, ग्रेडच्या आधारे कुठल्या पद्धतीने त्यांचे गुणांकन करण्यात येईल हे सांगण्यात यावे. नव्या गुणांकनाचा उत्पन्नावर थेट परिणाम होणार असल्याने ही मागणी पुढे रेटण्यात येत आहे. उत्पन्न घटण्याची भीती असल्यामुळेच अनेक खेळाडूंनी निवृत्त होण्याची बोर्डाला थेट धमकी दिली. बोर्डाने नव्या प्रणालीत खेळाडूंची प्रत्येकी चार - चारच्या गटात विभागणी केली. फिटनेसचा स्तर, शिस्त, नेतृत्वक्षमता, संघाप्रति योगदान, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधील त्यांची कामगिरी आदींचा विचार गुण देताना होईल.

Web Title: Sri Lankan players threaten to retire before series against India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.