सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर तीन वर्ष कायम राहणार? लवकरच होणार मोठा निर्णय

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 04:51 PM2019-11-10T16:51:13+5:302019-11-10T16:51:55+5:30

whatsapp join usJoin us
Sourav Ganguly to stay in-charge of BCCI for 3 years? AGM notice proposes various constitutional amendments | सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर तीन वर्ष कायम राहणार? लवकरच होणार मोठा निर्णय

सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर तीन वर्ष कायम राहणार? लवकरच होणार मोठा निर्णय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या. गांगुलीला केवळ दहा महिन्यांचा कार्यकाळ का, असा प्रश्नही अनेकांना पडला. पण, आता गांगुलीच्या चाहत्यांसाठी आणि क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची वार्ता येणार आहे. गांगुली आता तीन वर्षांसाठी बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर कायम राहू शकतो. त्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या असून बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत घटना दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. 

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा 1 डिसेंबरला होणार आहे आणि त्यात 12 मुद्यांसाठी घटना दुरुस्ती करण्यात येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार या बैठकीत बरेच मुद्दे चर्चिले जाणार आहेत. त्यासाठी आज मुंबईत एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीत लोकपाल, नवीन क्रिकेट सल्लागार समिती आदी काही मुद्दे आहेत. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दोन टर्म काम पाहिल्यानंतर कुलींग ऑफ वेळ पूर्ण केल्यानंतर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा नियम आहे. पण, आता नव्या प्रस्तावानुसार अध्यक्ष आणि सचिव यांना हा नियम लागू राहू नये, अशी सुचना करण्यात आली आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास बीसीसीआय अध्यक्ष गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ 3 वर्षांसाठी राहिल. 

सौरव गांगुली आता रवी शास्त्रींना लावणार कामाला; देणार 'ही' अतिरीक्त जबाबदारी
मुंबई : आतापर्यंत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे फक्त संघाबरोबरच असल्याचे पाहायला मिळाले आहे. पण आता त्यांना चागलंच कामाला लावलं जाणार आहे. कारण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शास्त्री यांनी अतिरीक्त जबाबदारी देण्याचे सुतोवाच केले आहे.आतापर्यंत फक्त भारतीय संघाबरोबर शास्त्री होते. भारतीय संघाचा सराव शास्त्री करून घेताता. त्याचबरोबर संघ व्यवस्थापनामध्येही त्यांचा सहभाग असतो. संघाची निवड, रणनीती आखणेस हे कामही शास्त्री करतात. पण आता त्यांना या व्यतिरीक्त नवीन काम करावे लागणार आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये जसे हाय परफॉर्मन्स सेंटर आहे, तसेच गांगुलीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला बनवायचे आहे. त्यासाठी एक जागाही त्यांनी पाहिली आहे. अकादमीचे संचालकपद सध्या भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडकडे आहे. पण रवी शास्त्री यांनीही या अकादमीमध्ये यावे आणि मार्गदर्शन करावे, असे गांगुलीला वाटत आहे. याबाबत गांगुली म्हणाला की, " राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालकपद द्रविडकडे आहे. या अकादमीमध्ये पारस म्हाम्ब्रेदेखील आहे. त्याचबरोबर भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुणही येथे येतात. पण शास्त्री येत नाहीत. पण आता त्यांना येथे येऊन मार्गदर्शन करावे लागेल."

Web Title: Sourav Ganguly to stay in-charge of BCCI for 3 years? AGM notice proposes various constitutional amendments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.