... So Jasprit Bumrah's career in crisis, a big blow to India | ... तर जसप्रीत बुमराचे करीअर संकटात, भारताला मोठा धक्का
... तर जसप्रीत बुमराचे करीअर संकटात, भारताला मोठा धक्का

मुंबई : दुखापतीमुळे सध्याच्या घडीला भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा संघातून बाहेर आहे. सध्याच्या घडीला बुमराचे करीअर धोक्यात आले आणि त्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसू शकतो, असे वक्तव्य एका माजी महान गोलंदाजाने केले आहे.
 स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे सध्याच्या घडीला संघाबाहेर आहेत. आता बरेच दिवस त्याला विश्रांती घ्यावी लागणार आहे. पण दुखापतींमधून सारवल्यानंतरही बुमराला पुनरागमन करणे सोपे नसेल आणि त्याचे करीअर जास्त काळ टिकू शकणार नाही, असे एका महान गोलंदाजाने स्पष्ट केले आहे.

वेस्ट इंडिजचे माजी महान गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी सांगितले की, " बुमराची गोलंदाजी तुम्ही बारकाईने पाहा. बुमराचा रन अप फारच कमी आहे. पण कमी रन अपमध्येही तो वेगवान गोलंदाजी करतो. या गोष्टी अर्थ असा आहे की, बुमरा फार कमी वेळात जास्त वेगाने चेंडू टाकतो आणि याचा परीणाम त्याच्या शरीरावत होताना दिसतो. आता नेमके त्याला कुठे फ्रॅक्चर झाले आहे, हे मला माहिती नाही. पण या गोष्टींमुळेच बुमराला त्रास होत असेल, असे डमला वाटते."

होल्डिंग यांनी यावेळी बुमराला एक सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, " बुमरा या दुखापतीमधून लवकर बरा व्हावा, असे मला वाटते. पण त्यानंतर जर बुमराने आपल्या गोलंदाजी शैलीमध्ये बदल केला नाही तर त्याचे करीअर जास्त काळ टिकू शकणार नाही. त्यामुळे या दुखापतीनंतर बुमराने पहिल्यांदा आपल्या गोलंदाजी शैलीत बदल करायला हवा. त्यानंतरच त्याने मैदानात यायला हवे, जेणेकरून एक चांगला गोलंदाज आपल्याला जास्त काळ मैदानात पाहू शकतो."


Web Title: ... So Jasprit Bumrah's career in crisis, a big blow to India
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.