Shocking! Steven Smith is out in bad fashion... | धक्कादायक! स्टीव्हन स्मिथ कसा आऊट झाला ते पाहाल तर हैराण व्हाल...

धक्कादायक! स्टीव्हन स्मिथ कसा आऊट झाला ते पाहाल तर हैराण व्हाल...

मुंबई : एखादा खेळाडू कसा आऊट होईल, हे सांगता यायचे नाही. पण ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ एका सामन्यात आगळ्या-वेगळ्या पद्धतीने बाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या गोष्टीचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला असून त्यामध्ये हा प्रकार तुम्हाला पाहता येईल.

स्टीव्हन स्मिथ हा एक आक्रमक फलंदाज म्हणून जगप्रसिद्ध आहे. पण ही शतकी खेळी त्याच्या चांगलीच लक्षात राहील. कारण या सामन्यात स्मिथ हा विचित्र पद्धतीने बाद झाल्याचे पाहायला मिळाले. स्मिथ बाद असल्याची अपील प्रतिस्पर्धी संघाकडून करण्यात आली. त्यावेळी पंचांनी थोडा वेळ घेतला आणि स्मिथ बाद असल्याचा निर्णय दिला. पण या निर्णयावर स्मिथ नाराज असल्याचे दिसून आले आणि त्याने आपली नाराजी व्यक्तही केली.

ऑस्ट्रेलियातील शेफिल्ड शिल्ड या स्पर्धेत स्मिथ फलंदाजी करत होता. यावेळी कारकिर्दीतील सर्वात संथ शतक त्याच्याकडून पाहायला मिळाले. आपले ४२वे शतक झळकावताना त्याला तब्बल २९० चेंडूंचा सामना करावा लागला. हे स्मिथच्या कारकिर्दीतील सर्वात संथ शतक ठरले आहे. शतक झाल्यावर स्मिथला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shocking! Steven Smith is out in bad fashion...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.