Shoaib Akhtar cites Babar Azam’s example to prove street smartness of Pakistan cricketers | ... म्हणून पाकिस्तानी क्रिकेटर स्ट्रिट स्मार्ट; बाबार आजमचा Video पोस्ट करत शोएब अख्तरनं केला दावा!

... म्हणून पाकिस्तानी क्रिकेटर स्ट्रिट स्मार्ट; बाबार आजमचा Video पोस्ट करत शोएब अख्तरनं केला दावा!

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shaoib Akhtar) यानं सोमवारी सोशल मीडियावर एक बाबर आजमचा ( Babar Azam) चा एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात पाकिस्तानी क्रिकेटपटू एवढे स्मार्ट का असतात, याचं कारण अख्तरनं समजावून सांगितले आहे. या व्हिडीओत बाबर घरात क्रिकेट खेळताना दिसत आहे आणि स्टम्पजवळ आलेला चेंडू तो शिताफीनं टोलवताना दिसत आहे. बाबरनं टोकालवेला हा चेंडू यष्टिरक्षकाला चकवून मागे जात आहे. या व्हिडीओच्या पुढील भागात बाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात फलंदाजी करताना तोच इनडोर क्रिकेटचा फटका लगावताना दिसत आहे. पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या ट्वेंटी-२० सामन्यातील हा फटका आहे.  ऋतुराज गायकवाडचा 'स्पार्क' संपला?, MS Dhoniनं बाकावर बसवण्याचा इशारा दिला!

बाबरनं सेंच्युरियन येथे झालेल्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ५९ चेंडूंत १२२ धावांची वादळी खेळी केली होती. या सामन्यात बाबरनं आफ्रिकेच्या गोलंदाजाच्या यॉर्करवर तो अफलातून फटका मारला. तो यॉर्कर चेंडू अडवण्याऐवजी बाबरनं शिताफिनं टोलावला.  

शोएब म्हणाला,''गल्ली आणि घरात क्रिकेट खेळून पाकिस्तानी क्रिकेटपटू स्मार्ट झाले आहेत. गल्ली व घरात जोरदार फटका मारण्याएवढी जागा नसते. त्यामुळे नवनवीन शॉट्सचा शोध लावला जातो. बाबरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात याचा नमूना दाखवला.''    गौतम गंभीर खवळला; KKRच्या कर्णधाराला नको नको ते बोलला, त्याच्याजागी भारतीय कर्णधार असता तर...

बाबर आजम नंबर वन
पाकिस्तानाचा बाबर आजम ( Pakistan skipper Babar Azam) याची तुलना विराटशी नेहमीच केली जाते. पण, टीम इंडियाचा कर्णधार आकड्यांच्या बाबतीत पाकिस्तानी फलंदाजांच्या खूप पुढे आहे. पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर यानं आयसीसीनं जाहीर केलेल्या वन डे फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. त्यामुळे ऑक्टोबर २०१७ पासून अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या विराटला पाकिस्तानी फलंदाजासाठी ती जागा सोडावी लागली. विराट १२५८ दिवस वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. ( Most consecutive days as No.1 ODI batsman in ICC rankings). वेस्ट इंडिजचे दिग्गज व्हिव्हियन रिचर्ड्स ( १७४८ दिवस) आणि ऑस्ट्रेलियाचा मायकेल बेवन ( १२५९) यांच्यानंतर विराट सर्वाधिक काळ वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान राहिला होता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shoaib Akhtar cites Babar Azam’s example to prove street smartness of Pakistan cricketers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.