IPL 2021, CSK vs RR T20 Live : ऋतुराज गायकवाडचा 'स्पार्क' संपला?, MS Dhoniनं बाकावर बसवण्याचा इशारा दिला!

ipl 2021  t20 CSK vs RR live match score updates  Mumbai पहिल्या सामन्यात भोपळाही फोडू न शकलेल्या फॅफ ड्यू प्लेसिसनं पंजाबविरुद्ध संयमी खेळ करताना संघाला विजय मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 04:14 PM2021-04-19T16:14:51+5:302021-04-19T16:15:16+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021, CSK vs RR T20 Live : Robin Uthappa to replace Ruturaj Gaikwad? CSK's likely XI against RR in IPL 2021 | IPL 2021, CSK vs RR T20 Live : ऋतुराज गायकवाडचा 'स्पार्क' संपला?, MS Dhoniनं बाकावर बसवण्याचा इशारा दिला!

IPL 2021, CSK vs RR T20 Live : ऋतुराज गायकवाडचा 'स्पार्क' संपला?, MS Dhoniनं बाकावर बसवण्याचा इशारा दिला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021  t20 CSK vs RR live match score updates Mumbai : आयपीएलच्या १४व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) शुक्रवारी पंजाब किंग्सला ( Punjab Kings) ६ विकेट्नं नमवून पहिल्या विजयाची नोंद केली. सलामीच्या सामन्यात CSKला दिल्ली कॅपिटल्सच्या सलामीवीर शिखर धवन व पृथ्वी शॉ यांनी धु धु धुतले होते. त्यामुळे आज होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध ( RR) महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा CSK अंतिम ११मध्ये काही बदल करण्याच्या तयारीत आहेत. IPL 2021 : CSK vs RR T20 Live Score Update गौतम गंभीर खवळला; KKRच्या कर्णधाराला नको नको ते बोलला, त्याच्याजागी भारतीय कर्णधार असता तर...

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात एकही विकेट घेण्यात अपयशी ठरलेल्या दीपक चहरनं पंजाब किंग्सचे कंबरडे मोडले. त्यानं मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, दीपक हुडा व निकोलस पूरन यांना झटपट माघारी पाठवले. शार्दूल ठाकूर व रवींद्र जडेजा यांना त्या सामन्यांत एकही विकेट घेता आली नव्हती. त्यामुळे त्यांच्याकडून आज चांगल्या कामगिरीची संघ व्यवस्थापनाला अपेक्षा आहे.CSK vs RR, CSK vs RR live score, 

पहिल्या सामन्यात भोपळाही फोडू न शकलेल्या फॅफ ड्यू प्लेसिसनं पंजाबविरुद्ध संयमी खेळ करताना संघाला विजय मिळवून दिला. CSKसाठी ही आनंदाची बातमी आहे. अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनी यांनाही अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही. मोईन अलीचा फॉर्म हा संघाच्या फायद्याचा ठरत आहे आणि तिसऱ्या क्रमांकवरील त्याचे स्थान पक्के समजले जात आहे. IPL 2021, IPL 2021 latest news, 

लुंगी एनगिडीनं क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला असून तो आजच्या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध आहे, परंतु परदेशी खेळाडू चांगली कामगिरी करत असल्यानं एनगिडीचा अंतिम ११मधील प्रवेश अनिश्चित आहे. RRविरुद्धच्या सामन्यात CSKसलामीवीर ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) याला बाकावर बसवण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी अनुभवी रॉबीन उथप्पाला संधी मिळण्याची शक्यता आहे. ऋतुराजला पहिल्या दोन सामन्यांत ५ व १६ धावाच करता आल्या आहेत. CSK vs RR IPL Matches, CSK vs RR IPL match 2021

चेन्नई सुपर किंग्सचा संभाव्य संघ ( CSK's likely playing XI) -  ऋतुराज गायकवाड/रॉबीन उथप्पा, फॅफ ड्यू प्लेसिस, सुरेश रैना, मोईन अली, अंबाती रायुडी, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, ड्वेन ब्राव्हो, शार्दूल ठाकूर, दीपक चहर 

राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ ( RR's likely playing XI ) - मनन वोहरा/यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल टेवाटिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, चेतन सकारीया, मुस्ताफिजून रहमान 

Web Title: IPL 2021, CSK vs RR T20 Live : Robin Uthappa to replace Ruturaj Gaikwad? CSK's likely XI against RR in IPL 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.