IPL 2020 : निराशाजनक कामगिरीनंतर CSKला धक्का; शेन वॉटसनचा निवृत्तीचा निर्णय

इंडियन प्रीमिअर लीगच्या (  IPL2020) १३व्या पर्वात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) अपयश आलं.

By स्वदेश घाणेकर | Published: November 2, 2020 04:58 PM2020-11-02T16:58:46+5:302020-11-02T17:01:42+5:30

whatsapp join usJoin us
Shane Watson has informed CSK that he's retiring from all forms of the game and further won't be part of the IPL also | IPL 2020 : निराशाजनक कामगिरीनंतर CSKला धक्का; शेन वॉटसनचा निवृत्तीचा निर्णय

IPL 2020 : निराशाजनक कामगिरीनंतर CSKला धक्का; शेन वॉटसनचा निवृत्तीचा निर्णय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या (  IPL2020) १३व्या पर्वात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) अपयश आलं. आयपीएलच्या इतिहासात CSK प्रथमच प्ले ऑफसाठी पात्र ठरला नाही आणि त्यांना १२ गुणांसह सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. यंदाच्या पर्वातील निराशाजनक कामगिरीनंतर CSKला आणखी एक धक्का बसला. संघाचा सलामीवीर शेन वॉटसन ( Shane Watson) यानं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय CSKच्या सहकाऱ्यांना कळवला आहे. त्यामुळे CSK सोबतचा प्रवास त्यानं येथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार वॉटसननं सहकाऱ्यांना निवृत्तीचा निर्णय सांगितला आहे. २०१८मध्ये वॉटसनला CSKनं आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. २०१८च्या मोसमातील अंतिम सामन्यात वॉटसननं शतकी खेळी करून संघाला जेतेपद पटकावून दिले होते. CSKच्या पूर्वी वॉटसननं राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं २००८मध्ये जेतेपद उंचावले होते.

''CSKच्या ड्रेंसिंगरुममध्ये येऊन त्यानं हा अखेरचा सामना असल्याचे सांगितले, त्यावेळी तो प्रचंड भावूक झाला होता. या फ्रँचायझीसोबत खेळणं हे भाग्य असल्याचे, त्यानं म्हटलं,''असे सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले. IPL 2020मधील कामगिरीनंतर २०२१च्या लीगसाठी वॉटसनला रिलिज केले जाईल, अशा चर्चा रंगल्या होत्या.   

वॉटसननं यंदाच्या आयपीएलमध्ये ११ सामन्यांत २९९ धावा केल्या. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. IPLमध्ये वॉटसनच्या नावावर १४५ सामन्यांत ३०.९९च्या सरासरीनं ३८७४ धावा आहेत आणि त्यात ४ शतकं व २१ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याच्या नावावर ९२ विकेट्सही आहेत. दरम्यान, शेन वॉटसन खेळाडू म्हणून निवृत्त होत असला तरी तो CSKसोबत राहिल आणि महेंद्रसिंग धोनी त्याला सपोर्ट स्टाफमध्ये घेईल. २०२१च्या आयपीएलसाठी नव्यानं संघबांधणी करण्यासाठी वॉटसन महत्त्वाचा ठरू शकतो . 

Web Title: Shane Watson has informed CSK that he's retiring from all forms of the game and further won't be part of the IPL also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.