गुवाहाटी : खेळपट्टी सुकवण्यासाठी कोणी इस्त्रीचा वापर करेल, हे तुमच्या डोक्यातही कधी आलं नसेल. तुम्ही ही गोष्ट डोळ्यासमोर आणून बघितली तर तुम्हालाच हसू येईल. पण ही गोष्ट घडली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात ही गोष्ट पाहायला मिळाली. ही लज्जास्पद गोष्ट घडल्यामुळे बीसीसीआयचे नाक कापले गेले, अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात आहे.

पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द करावा लागला, असे म्हटले गेले. पण हा सामना फक्त पावसामुळे नाही तर मैदान खेळण्यालायक करता आले नाही यासाठी. पाऊस गेल्यावर आसाम क्रिकेट असोसिएशनने मैदान सुकवण्यासाठी सुरुवातीला वॅक्युम क्लीनरचा वापर करण्यात आला. त्यानंतर हेअर ड्रायर वापरण्यात आला. यानंतर तर हद्दच झाली. आसाम क्रिकेट असोसिएशनने त्यानंतर चक्क इस्त्रीच मैदान सुकवण्यासाठी आणल्याचे पाहायला मिळाले.
![Ind vs SL: vacuum cleaner, Hair dryer and steam iron fail to save rain-hit India and Sri Lanka 1st T20 clash | Ind vs SL: पिच को सुखाने के लिए किया गया हेयर ड्रायर और स्टीम आयरन का इस्तेमाल, फिर भी नहीं हो पाया मैच]()
बीसीसीआयचं नाक कापलं; 'या' कारणांमुळे रद्द झाला पहिला सामना
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 पावसामुळे रद्द करण्यात आला. हा सामना रद्द झाल्यावर बीसीसीआयचं नाक कापलं गेलं. कारण काही वाईट कारणांमुळे हा सामना रद्द झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात पावसानं खोडा घातला. नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूनं लागला आणि विराट कोहलीनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यानंतर पावसानं एन्ट्री मारली. पावसाच्या दमदार एन्ट्रीनं चाहते निराश झाले. पावसाचा लपंडाव सुरूच राहिला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दोन वेळा पंचांसोबत खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी मैदानावर उतरला. पावणेदहा वाजता जेव्हा विराट कोहली पंचांसोबत खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी मैदानावर आला त्यावेळी तो नाखुश दिसला.
कोहली हा सामना रद्द झाल्यावर नाखुश असल्याचे पाहायला मिळाले. कारण नाणेफेक झाल्यावर हलक्या पावसाला सुरुवात झाली. १०-१२ मिनिटांनी पाऊस थांबत नाही हे पाहताच जिथून गोलंदाजी केली जाते तिथे कव्हर्स टाकण्यात आले. काही वेळाने पाऊस थांबला, पण ज्या ठिकाणी कव्हर्स टाकण्यात आले होते, ती जागादेखील मोठ्या प्रमाणात भिजली होती.
पावसाचे पाणी सुकवण्यासाठी आसाम क्रिकेट असोसिएशनने अशा काही गोष्टींचा वापर केला की, ते पाहता क्रिकेट चाहते नाराज झाले. जर अशी व्यवस्था आंतरराष्ट्रीय सामन्याला असेल तर पावसानंतर सामन्याचे काय होणार, असा सवाल चाहते विचारायला लागले आहेत. त्यामुळेच हा सामना रद्द झाल्यानंतर बीसीसीआयचे नाक कापले गेल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे.