शाहीन आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जसप्रीत बुमराहच्या नावावर असलेला विक्रम मोडला 

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदी ( Shaheen Afridi) यानं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली.

By स्वदेश घाणेकर | Published: February 27, 2021 11:45 AM2021-02-27T11:45:06+5:302021-02-27T11:45:33+5:30

whatsapp join usJoin us
Shaheen Afridi (20 years) is the youngest Fast Bowler in T20 history to take 100 wickets | शाहीन आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जसप्रीत बुमराहच्या नावावर असलेला विक्रम मोडला 

शाहीन आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जसप्रीत बुमराहच्या नावावर असलेला विक्रम मोडला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदी ( Shaheen Afridi) यानं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणाऱ्या आफ्रिदीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात १०० विकेट्स घेण्याचा विक्रम नावावर केला. त्यानं जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याचा विक्रम मोडला. बुमराहनं यापूर्वी २३ वर्ष व ५७ दिवसांचा असताना ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये १०० विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. आफ्रिदीनं २० वर्ष व ३२६ दिवसांचा असताना ट्वेंटी-20त १०० विकेट्स घेतल्या. टर्निंग खेळपट्टीवर फलंदाजांनी 'रबर सोल'चे शूज घालावेत; मोहम्मद अझरुद्दीनचा अजब गजब सल्ला

आफ्रिदीनं पाकिस्तान सुपर लीगच्या सातव्या सामन्यात ही पराक्रम केला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात १०० विकेट्सचा विक्रम तसा अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमान याच्या नावावर आहे. त्यानं १८ वर्ष व २७१ दिवसांचा असताना हा पराक्रम केला. पण, आफ्रिदी हा सर्वात सर्वात युवा जलदगती गोलंदाज ठरला. त्यांच्या व्यतिरिक्त राशिद खाननं १८ वर्ष व ३६० दिवसांचा असताना ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये विकेट्सचे शतक पूर्ण केले होते. पाकिस्तानच्या शादाब खान यानंही २० वर्ष व १४८ दिवसांचा असताना आणि इंग्लंडच्या डॅनी ब्रिग्स यानं २३ वर्ष व ५६ दिवसांचा असताना हा पराक्रम केला.


पाकिस्तान सुपर लीगमध्ये आफ्रिदी मुल्तान सुल्तान्सनं लाहोर कलंदर्स संघाला ७ विकेट्सनं पराभूत केलं. मुल्ताननं मोहम्मद रिझवानच्या ७६ धावांच्या खेळीच्या जोरावर हा विजय मिळवला. रिझवाननं ४९ चेंडूंत १२ चौकार लगावले. कलंदर्सनं प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १५७ धावा केल्या. या सामन्यात आफ्रिदीनं दोन विकेट्स घेतल्या. 
 

Web Title: Shaheen Afridi (20 years) is the youngest Fast Bowler in T20 history to take 100 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.