Sex with girlfriend is more pleasant than best performance; The world famous player said | सर्वोत्तम कामिगिरीपेक्षा गर्लफ्रेंडबरोबरचा सेक्स आनंददायी; सांगतोय हा जगविख्यात खेळाडू
सर्वोत्तम कामिगिरीपेक्षा गर्लफ्रेंडबरोबरचा सेक्स आनंददायी; सांगतोय हा जगविख्यात खेळाडू

नवी दिल्ली : आता एखाद्या व्यक्तीला कोणत्या गोष्टीमधून आनंद मिळेल, हे आपण सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या आनंद उपभोगण्याच्या गोष्टी या फार निराळ्या असतात. काहींना आपल्या कामामधून जास्त आनंद मिळतो, तर काहींना आपल्या कुटुंबियांसोबत जास्त आनंद मिळतो. एका जगविख्यात खेळाडूने तर मला सर्वोत्तम कामगिरीपेक्षा गर्लफ्रेंडबरोबरचा सेक्स जास्त आनंद देतो, असे धक्कादायक विधान करत सर्वांचीच झोप उडवली आहे.

हे विधान करणाऱ्या खेळाडूने संपूर्ण क्रीडा विश्व ओळखते. काहींच्या गळ्यातील ताइत हा खेळाडू आहे. त्याचे कोट्यावधींमध्ये चाहते आहेत. आपल्या जादुई खेळाच्या जोरावर त्याने बऱ्याच जणांना मंत्रमुग्धही केले आहे. आपल्या नेत्रदीपक खेळासाठी तो भरपूर मेहनत करतानाही दिसतो. पण आता तर त्याने हे धक्कादायक विधान केल्यामुळे त्याचा खेळ किती पाहायचा, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

या खेळाडूची एक विशेष मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळी या खेळाडूला अडचणीत टाकणारा एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी दोन संघांची तुलना करताना तुझी सर्वोत्तम कामगिरी कोणत्या टीमबरोबर झाली, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी दोन्हीपैकी एका संघाचे नाव घेणे, या खेळाडूने टाळले आणि आपल्या गर्लफ्रेंडचे नाव घेऊन तो मोकळा झाला. त्यामुळे आता या विधानामुळे तो खेळाडू चर्चेचा विषय बनला आहे. आता हा खेळाडू कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल... तर हा खेळाडू आहे जगप्रसिद्ध फुटबॉलपटू.

रोनाल्डोला एका मुलाखतीमध्ये रिअल माद्रिद किंवा ज्युवेंट्स या संघांमधून केलेला कोणता गोल सर्वोत्तम वाटतो, असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना रोनाल्डोने आपल्या गर्लफ्रेंडचे नाव घेतले. दिग्गज फुटबॉलपटूख्रिस्तियानो रोनाल्डो लवकरच लग्न करणार आहे. 34 वर्षीय फुटबॉलपटू तीन वर्षांपासून 25 वर्षीय जॉर्जिना रॉड्रीगेजला डेट करत आहे. या दोघांनी लवकर लग्न करावे अशी इच्छा रोनाल्डोची आई मारीया डोलोरेस डॉस सांतोस अव्हेइरो यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Sex with girlfriend is more pleasant than best performance; The world famous player said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.