सेहवागने हर्षा भोगलेंना दिल्या 'वीरुस्टाईल' शुभेच्छा

आज समाचोलक हर्षा भोगले यांचा 57वा वाढदिवस होता. त्यांना सेहवागने 'वीरुस्टाईल' शुभेच्छा दिल्या आणि भोगले यांनाही त्या आवडल्या. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 19:55 IST2018-07-19T19:55:18+5:302018-07-19T19:55:51+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Sehwag gives special wishesh to harsha bhogle | सेहवागने हर्षा भोगलेंना दिल्या 'वीरुस्टाईल' शुभेच्छा

सेहवागने हर्षा भोगलेंना दिल्या 'वीरुस्टाईल' शुभेच्छा

ठळक मुद्देसेहवाग तु जेव्हा फलंदाजीला यायचास, तेव्हा साधारण बोलणारेही शायर व्हायचे, असे भोगले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

नवी दिल्ली : वीरेंद्र सेहवाग हा आपल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ओळखला जायचा. क्रिकेटला रामराम केल्यावर सेहवागने समाचोलन करायला सुरुवात केली आणि त्याची बोलण्याची शैली साऱ्यांनाच समजली. आज समाचोलक हर्षा भोगले यांचा 57वा वाढदिवस होता. त्यांना सेहवागने 'वीरुस्टाईल' शुभेच्छा दिल्या आणि भोगले यांनाही त्या आवडल्या. 

सेहवागने काय शुभेच्छा दिल्या ते पाहा


भोगले यांनी सेहवागच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. त्यानंतर त्यांनी सेहवागचे कौतुकही केले. सेहवाग तु जेव्हा फलंदाजीला यायचास, तेव्हा साधारण बोलणारेही शायर व्हायचे, असे भोगले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हर्षा भोगले यांनी केलेले ट्विट


Web Title: Sehwag gives special wishesh to harsha bhogle