RR vs KXIP Latest News: Mayank Agarwal (106), KL Rahul (69) power Kings XI Punjab to 223/2 against Rajasthan Royals in Sharjah | RR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं 

RR vs KXIP Latest News : मयांक-लोकेशनं RRला धु धु धुतले; KXIPनं तगडं आव्हान उभं केलं 

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) हे दोन तगडे संघ भिडत आहेत. RRकर्णधार स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith)ने नाणेफेक जिंकून KXIPला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी KXIPला दमदार सुरुवात करून दिली. राहुलनं RCBविरुद्ध शतकी खेळी केली होती आणि आज मयांकनं 45 चेंडूंत शतक पूर्ण केले. IPLमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. लोकेशनेही दमदार खेळ केला आणि त्यांच्या या अफलातून खेळाच्या जोरावर KXIPनं मोठी धावसंख्या उभी केली. RR vs KXIP Latest News & Live Score

मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम

जयदेव उनाडकटनं टाकलेल्या तिसऱ्या षटकात मयांकने खणखणीत षटकार व चौकार खेचला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथनं चौथ्या षटकात जोफ्रा आर्चरला ( Jofra Archer) पाचारण केले. लोकेश राहुलनं पहिल्या तीन चेंडूंत सलग चौकार खेचून आर्चरचे स्वागत केले. मयांक एका बाजूने RRच्या गोलंदाजांची पीसे काढत असताना राहुल संयमी खेळी करत त्याला योग्य साथ देत होता. या दोघांनी पहिल्या दहा षटकांत बिनबाद 110 धावा चोपल्या. IPL2020मधील ही पहिली शतकी भागीदारी ठरली. 

 

किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे

IPL 2020मधील 'Daddy Army'! DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो

IPL 2020 ची ट्रॉफी रोज स्टेडियमवर कशी व कोण आणतं; पाहा खास Video

लोकेश राहुलनंही 35 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. IPL 2020त दोनशे धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान लोकेश राहुलनं पटकावला. त्यानं 3 सामन्यांत 204च्या सरासरीनं दोनशे + धावा केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध नाबाद 132 ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्यापाठोपाठ मयांकनेही दोनशे धावांचा पल्ला पार केला. त्यानं 101च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. 15व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून मयांकनं IPLमधील पहिले शतक पूर्ण केले. 45 चेंडूंत त्यानं 98 चौकार व 7 षटकारांसह हे शतक पूर्ण केले. या खेळीसह मयांकनं 2010च्या मुरली विजयचा विक्रम मोडला. 17व्या षटकात टॉम कुरननं त्याला बाद केले. मयांकनं 50 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकारांसह 106 धावा चोपल्या. RR vs KXIP Latest News & Live Score

रियान परागची सुपर डाईव्ह; RRसाठी अडवल्या 5 धावा, Video

KL Rahulनं मिळवला पहिला मान, 204च्या सरासरीनं चोपल्यात धावा

लोकेश राहुलही पुढच्या षटकात माघारी परतला. त्यानं 54 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 69 धावा केल्या. मयांक व लोकेश यांनी भक्कम पाया रचल्यानंतर अखेरच्या षटकांत निकोलस पूरन व ग्लेन मॅक्सवेल यांनी मुक्तपणे फटकेबाजी केली आणि KXIPला 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा करून दिला. मॅक्सवेल 12, तर पूरन 25 धावांवर नाबाद राहिले. RR vs KXIP Latest News & Live Score

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: RR vs KXIP Latest News: Mayank Agarwal (106), KL Rahul (69) power Kings XI Punjab to 223/2 against Rajasthan Royals in Sharjah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.