RCB vs SRH Latest News : Unfortunate dismissal of David Warner; Watch Video | RCB vs SRH Latest News : दुर्दैवी; कॅच सुटला जॉनी बेअरस्टोचा पण OUT झाला डेव्हिड वॉर्नर, Video

RCB vs SRH Latest News : दुर्दैवी; कॅच सुटला जॉनी बेअरस्टोचा पण OUT झाला डेव्हिड वॉर्नर, Video

विराट कोहली ( Virat Kohli) च्या रॉयल चॅलेजर्स बंगळुरुच्या ( Royal Challengers Bangalore) जेतेपदाचे स्वप्न साकार करण्याच्या मोहिमेला आजपासून प्रारंभ झाला. सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ( Sunrisers Hyderabad)चा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ( David Warner) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. RCBकडून आरोन फिंच ( Aaron Finch) आणि देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) यांनी दमदार सुरूवात केली. पदार्पणातच RCBच्या देवदत्तनं पॉवर प्लेमध्ये तुफान फटकेबाजी करून SRHच्या गोलंदाजांना हैराण करत अर्धशतक पूर्ण केले. देवदत्त-फिंच यांनी रचलेल्या मजबूत पायावर Mr. 360 एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) ने धावांचा डोंगर उभा केला. AB नेही 29 चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना RCBला मोठा पल्ला गाठून दिला. लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर मात्र दुर्दैवी ठरला. ( RCB vs SRH Live Score & Updates )

देवदत्त पडीक्कलच्या फटकेबाजीनंतर 'Mr. 360'चं वादळ घोंगावलं; RCBनं SRHला झोडपलं

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवदत्तनं SRHच्या गोलंदाजांची धुलाई केली. मागील मोसमात त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती आणि यंदा मिळालेल्या संधीचं पहिल्याच सामन्यात सोनं करण्याच्या निर्धारानं Padikkal मैदानावर उतरला होता. त्यानं पदार्पणाच्या सामन्यात 36 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. 47 धावांवर असताना त्यानं टोलावलेला चेंडू झेलण्याची संधी SRHच्या खेळाडूने दवडली आणि देवदत्तचे अर्धशतक पूर्ण झाले. त्याला फिंचची संयमी साथ मिळाल्यानं RCBनं पहिल्या दहा षटकांत 86 धावा केल्या. 11व्या षटकात देवदत्तला पुन्हा जीवदान मिळाले. पण, त्याच षटकात विजय शंकरनं त्याचा त्रिफळाचीत केले. देवदत्तनं 42 चेंडूंत 8 चौकारांसह 56 धावा केल्या. पुढच्याच षटकात फिंचही बाद झाला. अभिषेक शर्मानं ( Abhishek sharma) ने त्याला 29 धावांवर पायचीत केले.( RCB vs SRH Live Score & Updates )

देवदत्त पडीक्कलची पदार्पणातील अर्धशतकाची परंपरा कायम, मोडला AB de villiersचा विक्रम

सहा महिन्यांनंतर मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीकडून ( Virat Kohli) मोठ्या खेळीची अपेक्षा होती. AB de Villiers सोबत त्यानं चांगली भागीदारीचे स्वप्न दाखवलं, परंतु T Natarajanने त्याला बाद केले. विराटला 14 धावाच करता आल्या. त्यानंतर एबीनं दमदार खेळ करताना 30 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 51 धावा केल्या. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर RCBनं 5 बाद 163 धावा कुटल्या. 

IPL 2020 त सुरू झाला नवा वाद; दुजाभाव झाल्याच्या आरोपावरून फ्रँचायझींचा थेट BCCIवर वार!

 ...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी

एबी डिव्हिलियर्सनं केला पराक्रम, ठरला RCBकडून दुसरा यशस्वी फलंदाज


लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर ( David Warner) कॉन्फिडन्ट वाटला. त्यानं डेल स्टेनच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकारही खेचला. वॉर्नर हा सामना एकहाती घेऊन जाईल असेच वाटत होते, परंतु दुर्दैवानं त्याची विकेट पडली. उमेश यादवनं टाकलेल्या दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोने स्ट्रेट फटका मारला. यादवनं तो झेलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या हाताला लागून चेंडू उलट दिशेच्या यष्टींवर आदळला आणि वॉर्नरला माघारी जावं लागलं. 

पाहा नेमकं काय घडलं.

English summary :
Unfortunate dismissal but RCB have struck gold. Umesh can't hang on to a tough return catch, but deflects the ball onto the stumps and has Warner short while backing up. OUT for 6

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: RCB vs SRH Latest News : Unfortunate dismissal of David Warner; Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.