RCB vs KKR clash called off due to rain in Bengaluru Kolkata Knight Riders Eliminated : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील स्पर्धेला पुन्हा सुरुवात झाली, पण पावसाच्या व्यत्ययामुळे एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना अखेर रद्द करण्याची वेळ आली. दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला. हा सामना अनिर्णित राहिल्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या स्पर्धेतील उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या. KKR प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडणारा चौथा संघ ठरला आहे. दुसरीकडे एका गुणासह RCB च्या संघाने गुणतालिकेत अव्वलस्थान मिळवले आहे. पण अजूनही त्यांना अधिकृतरित्या प्लेऑफ्ससाठी पात्र असल्याचा टॅग लागलेला नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आरसीबीचा प्लेऑफ्सचा मार्ग सोपा, पण...
बंगळुरुच्या मैदानातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या खात्यात १२ सामन्यानंतर ८ विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह मिळालेल्या एका गुणासह १७ गुण मिळाले आहेत. प्लेऑफ्सचा त्यांचा मार्ग सोपा झाला असला तरी गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचूनही या संघासह एकही संघ अद्याप प्लेऑफ्ससाठी अधिकृतरित्या पात्र ठरलेला नाही.
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
मॅच झाली नाही, पण तरीही विराटची हवा त्याचं झालं असं की, ....
विराट कोहलीनं नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्याचे पाहायला मिळाले. १४ वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये अधिराज्या गाजवणाऱ्या किंग कोहलीच्या सन्मानासाठी RCB चाहत्यांनी खास शक्कल लढवल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीसाठी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खास माहोल तयार करण्यात आला होता. चाहत्यांनी १८ नंबरच्या व्हाइट जर्सीसह मैदानात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. किंग कोहली मैदानात उतरला नसला तरी त्याच्या नावाच्या १८ नंबर जर्सीसह स्टेडियममध्ये चाहत्यांकडून विराट शक्ती प्रदर्शनाचा नजराणा दाखवून दिला. ही गोष्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरतान दिसते.
KKR चा संघ स्पर्धेतून आउट
या सामन्याआधी कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने १२ पैकी ५ सामन्यातील विजय आणि ६ पराभवासह ११ गुणांची कमाई केली होती. बंगळुरु विरुद्ध यंदाच्या हंगामातील त्यांचा दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. परिणामी या सामन्यातील एका गुणासह त्यांच्या खात्यात १३ सान्यानंतर १२ गुण जमा झाले आहेत. अखेरचा सामना जिंकला तरी ते १३ गुणांपर्यंतच पोहचू शकतात. त्यामुळे त्यांचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. याआधी चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स सनरायझर्स हैदराबाद हे तीन संघ स्पर्धेतून बाद झाले होते. आता KKR च्या रुपात आता चौथा संघ स्पर्धेतून बाहेर पडला असून उर्वरित ६ संघात ४ जांगासाठीची स्पर्धा उरली आहे.
Web Title: RCB vs KKR clash called off due to rain in Bengaluru Kolkata Knight Riders Eliminated Royal Challengers Bengaluru Top In Points Table But
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.