सांघिक खेळाच्या जोरावर विश्वविजेत्यांना धक्का, वन-डे मालिकेनंतर खेळाडूंचे रिपोर्ट कार्ड

Indian cricket team : एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाने सांघिक खेळ करत विश्वविजेत्यांना धक्का दिला. या मालिकेतील कामगिरीनुसार सादर करत आहे भारतीय खेळाडूंचे रिपोर्ट कार्ड...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 09:22 AM2021-03-31T09:22:26+5:302021-03-31T09:26:02+5:30

whatsapp join usJoin us
Push the world champions on the strength of team play | सांघिक खेळाच्या जोरावर विश्वविजेत्यांना धक्का, वन-डे मालिकेनंतर खेळाडूंचे रिपोर्ट कार्ड

सांघिक खेळाच्या जोरावर विश्वविजेत्यांना धक्का, वन-डे मालिकेनंतर खेळाडूंचे रिपोर्ट कार्ड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध निर्विवाद वर्चस्व राखताना तिन्ही मालिका जिंकल्या. कसोटी मालिका ३-१ अशी जिंकल्यानंतर भारताने टी-२० मालिका ३-२, तर एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकत इंग्लंडला क्लीन स्वीप दिला. एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाने सांघिक खेळ करत विश्वविजेत्यांना धक्का दिला. या मालिकेतील कामगिरीनुसार सादर करत आहे भारतीय खेळाडूंचे रिपोर्ट कार्ड... 

विराट कोहली (१० पैकी ८ गुण) :
टी-२० प्रमाणेच एकदिवसीय सामन्यांतही कोहली फलंदाजीत फॉर्ममध्ये दिसला. मात्र, त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे त्याचे नेतृत्व ठरले.  
शिखर धवन (१० पैकी ८) :
दडपणाखाली आल्यानंतर धवनने जबरदस्त खेळी करत संघातील आपले स्थान भक्कम केले. दोन अर्धशतके झळकावत त्याने निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविला.
रोहित शर्मा (१० पैकी ६) :
पूर्ण मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये दिसला, मात्र तरीही त्याला तीन सामन्यांतून केवळ ९० धावाच करता आल्या. 
लोकेश राहुल (१० पैकी ८) :
टी-२० मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर राहुल दडपणात होता. कोहलीने भक्कम पाठिंबा दिल्यानंतर राहुलने टीकाकारांना जोरदार उत्तर देताना शानदार अर्धशतक आणि शतक झळकावले. 
ऋषभ पंत (१० पैकी ९) :
१५१.९६च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने दोन आक्रमक अर्धशतके झळकावत पंतने आपले नाणे खणखणीत वाजवले. यावरून त्याचे संघातील स्थान किती महत्त्वाचे आहे हेच सिद्ध होते. 
श्रेयस अय्यर (१० पैकी २) :
केवळ एक सामना खेळला, त्यानंतर दुखापतग्रस्त झाल्याने संपूर्ण मालिकेतून बाहेर गेला.  
हार्दिक पांड्या (१० पैकी ७) :
अखेरच्या सामन्यात सोडलेले दोन झेल वगळता शानदार कामगिरी राहिली.  
कृणाल पांड्या (१० पैकी ६) :
शानदार अर्धशतकासह आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटची सुरुवात केली. मालिकेत फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली; पण गोलंदाजीमध्ये मात्र फारशी छाप पाडता आली नाही. 
शार्दुल ठाकूर (१० पैकी ९) :
मालिकेत भारताकडून सर्वाधिक बळी घेतले आणि जेव्हा कधी त्याच्याकडून बळी मिळवण्याची अपेक्षा केली, त्यात तो खरा उतरला. 
भुवनेश्वर कुमार (१० पैकी ९) :
मालिकेतील एक सर्वोत्तम गोलंदाज. कौशल्य आणि सातत्यपूर्ण मारा करत भुवीने दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग केला. 
प्रसिद्ध कृष्णा (१० पैकी ८) :
या मालिकेत भारताला गवसलेला खेळाडू ठरला. पदार्पणातच ४ बळी घेत कृष्णाने शानदार सुरुवात केली. 
टी. नटराजन (१० पैकी ६) :
केवळ अखेरच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि अत्यंत रोमांचक स्थितीत कोहलीने त्याच्यावर अखेरचे षटक टाकण्याची जबाबदारी दिली. हा विश्वास नटराजनने सार्थ ठरविला. अचूक यॉर्करच्या जोरावर त्याने सॅम कुरेनला जखडवून ठेवले आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
कुलदीप यादव : (१० पैकी २)
दोन्ही संघांतील फिरकीपटू या मालिकेतील सपाट खेळपट्टीवर दबावात होते. कुलदीप अत्यंत महागडा गोलंदाज ठरला. कुलदीपने मालिकेत १९ षटके गोलंदाजी करत तब्बल १५२ धावा दिल्या, मात्र बळी एकही मिळवता आला नाही. 

Web Title: Push the world champions on the strength of team play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.