Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!

MI vs PBKS: आयपीएलचा यंदाचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज दुसरा क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 20:28 IST2025-06-01T20:27:20+5:302025-06-01T20:28:55+5:30

whatsapp join usJoin us
Punjab Kings Skipper shreyas iyer have Chance Create History | Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!

Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएलचा यंदाचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज दुसरा क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ आरसीबीशी अंतिम सामन्यात भिडेल. पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्जला आरसीबीविरुद्ध दारुण पराभवाचा सामना करावा लागला. तर, एलिमिनिटेर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरातचा पराभव करून क्वालिफायर २ चे तिकीट मिळवले. दरम्यान, मुंबईविरुद्धच्या सामन्यात पंचाबचा कर्णधार श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी आहे.

आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच २००८ मध्ये पंजाबने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. यानंतर दीर्घ प्रतीक्षेनंतर २०१४ मध्ये पंजाबने चांगली कामगिरी दाखवून अंतिम फेरीत प्रवेश केला. पंरतु, या सामन्यात पंजाबला पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांचे आयपीएलची ट्ऱॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. आता ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणि विजेतेपद जिंकण्याची उत्तम संधी आहे.

या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने शानदार कामगिरी केली. आयपीएलच्या गुणतालिकेत पंजाबचा संघ १९ गुणांसह अव्वल स्थानावर राहिला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर, आयपीएलमध्ये एक नवा इतिहास रचला जाईल.

अय्यरकडे आयपीएलमध्ये तिसऱ्या संघाला अंतिम फेरीत नेण्याची उत्तम संधी आहे. याआधी त्याने २ वेगवेगळ्या संघांना अंतिम फेरीत पोहोचवले आहे. आयपीएल २०२० मध्ये, त्याने त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने अंतिम फेरीत गाठली होती. परंतु संघ विजेतेपद जिंकण्यापासून हुकला. यानंतर, अय्यरच्या नेतृत्वाखाल कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच केकेआर संघाने गेल्या हंगामात केवळ अंतिम फेरी गाठली नाही तर सनरायझर्स हैदराबादला हरवून विजेतेपदही जिंकले. आता त्याच्याकडे तिसऱ्या संघाला अंतिम फेरीत नेण्याची आणि आयपीएलमध्ये इतिहास रचण्याची उत्तम संधी आहे.

Web Title: Punjab Kings Skipper shreyas iyer have Chance Create History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.