From president Sourav Ganguly to secretary Jay Shah - all you need to know about BCCI's new staff | सौरव गांगुलीसह बीसीसीआयच्या नव्या टीमबद्दल जाणून घ्या सर्वकाही 
सौरव गांगुलीसह बीसीसीआयच्या नव्या टीमबद्दल जाणून घ्या सर्वकाही 

माजी कर्णधार सौरव गांगुलीनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रं अधिकृतरित्या हातात घेतली. 65 वर्षानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार प्रथमच बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर विराजमान होणार आहे. स्थानिक क्रिकेटपटूंचा मुद्दा हाती घेत, गांगुलीनं पहिल्याच बैठकीत आपला निर्धार व्यक्त केला. त्याचबरोबर त्यानं बीसीसीआयची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी योग्य पावलं उचलली जातील असेही सांगितले. भारतीय संघाला जगात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी कर्णधार विराट कोहलीच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारीही गांगुलीनं दाखवली आहे. 


गांगुलीसमोर पुढील 9-10 महिने बरीच आव्हानं आहेत आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी गांगुलीच्या मदतीला नवीन टीम असणार आहे. बीसीसीआयच्या सचिवपदी जय शाहा यांची निवड झाली आहे. खजिनदार म्हणून अरुण सिंह धुमाळ, उपाध्यक्षपदी माहीम वर्मा, सहसचिवपदी जयेश जॉर्ज यांची निवड झाली आहे.  

जय शाहा - 31 वर्षीय जय शाहा हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व गृहमंत्री अमित शाहा यांचा मुलगा आहे. सप्टेंबर 2013मध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या सहसचिवपदी जय यांची निवड झाली होती. तेव्हापासून ते गुजरात असोसिएशनवर कार्यरत आहेत.

जयेश जॉर्ज - 50 वर्षीय जयेश यांच्याकडे क्रिकेट असोसिएशनच्या प्रशासकिय कामाचा अनुभव आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांनी 2005 पासून विविध पदांवर काम केले आहे.  

माहिम वर्मा - उत्तराखंड क्रिकेट असोसिएशमध्ये 45 वर्षीय माहिम यांच्याकडे 10 वर्ष काम करण्याचा अनुभव आहे. 


Web Title: From president Sourav Ganguly to secretary Jay Shah - all you need to know about BCCI's new staff
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.