पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात शनिवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा सलामीवीर प्रभसिमरन सिंगने चांगली फलंदाजी केली. त्याने अवघ्या ४९ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. या कामगिरीसह प्रभसिमरन सिंगने खास विक्रमाला गवसणी घातली.
केकेआरविरुद्धच्या सामन्यात प्रभसिमरनने अवघ्या ४९ चेंडूत सहा षटकारांच्या मदतीने ८३ धावा केल्या. या कामगिरीसह तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून १००० धावांचा टप्पा गाठणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला. आयपीएलमध्ये आतापर्यंत कोणत्याही अनकॅप्ड खेळाडूला अशी कामगिरी करता आली नाही. प्रभसिमरन २०१९ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याच्या पहिल्या हंगामात त्याची पंजाबसाठी निवड झाली. प्रभसिमरन २०१९ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे, लिलावात पंजाबच्या संघाने त्याच्यावर बोली लावली. आतापर्यंत प्रभसिमरनने ४३ सामन्यांमध्ये १ हजार ४८ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
पावसामुळे सामना रद्द
आयपीएल २०२५ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील हा पहिला सामना आहे, जो पावसामुळे रद्द झाला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २०१ धावा केल्या. प्रियांश आर्य (६९ धावा) आणि प्रभसिमरन (८३ धावा) यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. प्रियांश बाद झाला, तेव्हा पंजाबची धावसंख्या ११.५ षटकांत १२० होती. श्रेयस अय्यरने १६ चेंडूत २५ धावा करत नाबाद राहिला. ग्लेन मॅक्सवेल (७ धावा) पुन्हा अपयशी ठरला. कोलकाता नाईट रायडर्सचा डावातील एका षटकानंतर पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे सामना बराच वेळ थांबवण्यात आला. अखेर हा सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघाला प्रत्येकी एक-एक गुण मिळाले आहे.
गुणतालिकेत पंजाबचा संघ चौथ्या स्थानावर
पंजाब किंग्जने ९ पैकी पाच सामने जिंकले आहेत. यातील एक सामना रद्द झाला. सध्या संघाचे ११ गुण आहेत. पंजाबने मुंबई इंडियन्सला मागे टाकत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे.
Web Title: Prabhsimran Singh made history for Punjab Kings, becoming first uncapped batter to surpass 1000 IPL runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.