शाब्बास; UPSC परीक्षेत अंध मुलीचं घवघवीत यश, मौहम्मद कैफनं उलगडला तिचा प्रेरणादायी प्रवास!

मदुरै येथे राहणारी सुंथरी चौथ्या प्रयत्नांत यशस्वी झाली आणि तिनं 286वी रँक मिळवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 01:46 PM2020-08-14T13:46:57+5:302020-08-14T13:47:51+5:30

whatsapp join usJoin us
Poorna Sundari, a visually impaired woman secured 286th rank in UPSC civil services exam 2019, mohammad kaif congratulate her  | शाब्बास; UPSC परीक्षेत अंध मुलीचं घवघवीत यश, मौहम्मद कैफनं उलगडला तिचा प्रेरणादायी प्रवास!

शाब्बास; UPSC परीक्षेत अंध मुलीचं घवघवीत यश, मौहम्मद कैफनं उलगडला तिचा प्रेरणादायी प्रवास!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अथक मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तामिळनाडूच्या 25 वर्षीय अंध मुलगी पुर्णा सुंथरीनं UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवले. तिनं UPSC परीक्षेत देशात 286 स्थान पटकावून सर्वांची वाहवाह मिळवली. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनंही कौतुक केलं. कैफनं सोशल मीडियावर सुंथराच्या यशाचं कौतुक करताना तिच्या प्रेरणादायी प्रवासाची गोष्ट सांगितली. त्यानं लिहिलं की,''तामिळनाडूच्या 25 वर्षीय दृष्टीहीन पुर्णा सुंथरीनं सर्व अडचणींवर मात करून UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलं.''

कैफनं तिच्या यशाची संपूर्ण गोष्ट सांगितली,''अभ्यासासाठी ऑडीओ स्टडि मटेरियल शोधणं अवघड होतं. पण, तिच्या आई-वडिलांनी आणि मित्रांनी पुस्तकं वाचून तिचा अभ्यास करून घेतला. त्यांनी पुस्तकांचे ऑडीओत रुपांतर केलं आणि त्यांच्या मदतीनं ती IAS ऑफिसन बनली. स्वप्नांचा पाठलाग करणं कधीच सोडू नका.''


मदुरै येथे राहणारी सुंथरी चौथ्या प्रयत्नांत यशस्वी झाली आणि तिनं 286वी रँक मिळवली. तिनं ANIला सांगितलं की,''आई-वडीलांनी मला नेहमी पाठींबा दिला. माझं हे यश त्यांना समर्पित करतो. या परीक्षेसाठी मी पाच वर्ष मेहनत घेतली.'' 

11वीत असल्यापासून मी IAS अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिलं होतं. शिक्षण, आरोग्य आणि महिला सबलिकरण या क्षेत्रात तिला काम करायचे आहे.  

IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी मोठी बातमी; रोहित शर्माच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

IPL 2020 : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिका ठरली; CSK, RCB अन् KKR फ्रँचायझींची चिंता वाढली

Bowl Out काय असतं रे भाऊ? पाक कर्णधाराकडे नव्हतं उत्तर; इरफान पठाणनं सांगितला किस्सा

पाकिस्तानचा पोपट झाला; 3911 दिवसांनी फलंदाजाला दिली संधी, पण त्याला फोडता आला नाही 'भोपळा'!

Web Title: Poorna Sundari, a visually impaired woman secured 286th rank in UPSC civil services exam 2019, mohammad kaif congratulate her 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.