खेळाडूंनी केला कसोटी सामन्यासारखा सराव

काहींनी क्षेत्ररक्षणही केले.अनेक खेळाडू मागच्या दोन महिन्यात आयपीएलमध्ये व्यस्त होते. त्यांनी पांढऱ्या चेंडूऐवजी कसोटीत उपयोगात येणाऱ्या लाल आणि गुलाबी चेंडूने सरावास प्राधान्य दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 01:50 AM2020-11-18T01:50:38+5:302020-11-18T01:50:51+5:30

whatsapp join usJoin us
The players practiced like a Test match | खेळाडूंनी केला कसोटी सामन्यासारखा सराव

खेळाडूंनी केला कसोटी सामन्यासारखा सराव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी : भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वांत आधी तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला सामोरे जायचे आहे. तरीही कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली संघातील अनुभवी फलंदाजांनी पुढील महिन्यात आयोजित कसोटी सामन्यांच्या मालिकेची तयारी म्हणून मंगळवारी गुलाबी आणि लाल चेंडूने फलंदाजीचा सराव केला. सरावाच्या वेळी वन डे, कसोटी आणि टी-२० संघातील सर्वच खेळाडू उपस्थित होते. सर्वांनी  फलंदाजी, गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणाचेही धडे घेतले. कर्णधार विराट कोहली याने स्वत:च्या ट्विटरवर सरावाचे फोटो शेअर केले. यात अनुभवी मोहम्मद शमी आणि युवा गोलंदाज मोहम्मद सिराज फलंदाजांना नेट्‌समध्ये मारा करताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबत विराटने लिहिले,‘मला कसोटी सामन्याचा सराव करणे पसंत आहे.’
कोहली १७ डिसेंबरपासून ॲडिलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीत खेळल्यानंतर पत्नी अनुष्का शर्माच्या बाळंतपणाच्यावेळी उपस्थित राहण्यासाठी मायदेशी परतणार आहे. त्यानंतरच्या तिन्ही कसोटी सामन्यात तो खेळणार नाही.
खेळाडूंनी मैदानाच्या मध्यभागी असलेल्या खेळपट्टीेवर गोलंदाजी आणि फलंदाजी केली. अनेक फलंदाज कसोटी सामन्यासारखेच धावा घेताना दिसले. काहींनी क्षेत्ररक्षणही केले.अनेक खेळाडू मागच्या दोन महिन्यात आयपीएलमध्ये व्यस्त होते. त्यांनी पांढऱ्या चेंडूऐवजी कसोटीत उपयोगात येणाऱ्या लाल आणि गुलाबी चेंडूने सरावास प्राधान्य दिले.
सलामीचा फलंदाज राहुल देखील गुलाबी चेंडूवर फलंदाजी करीत होता.यामुळे तो पहिल्या कसोटीत अंतिम ११ खेळाडूत असेल, असे संकेत मिळाले आहेत.

Web Title: The players practiced like a Test match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.