pitch changes in New Zealand - Sachin Tendulkar | न्यूझीलंडमधील खेळपट्टीत बदल - सचिन तेंडुलकर

न्यूझीलंडमधील खेळपट्टीत बदल - सचिन तेंडुलकर

नवी दिल्ली : ‘न्यूझीलंडमधील खेळपट्ट्यांच्या प्रकारात आता बदल झाले आहेत. फलंदाजीसाठी अनुकुल असलेल्या या खेळपट्टीवर भारताकडे यजमान संघाला अडचणीत आणण्याची क्षमता आहे,’ असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

सचिनने सांगितले की, ‘१९९० ते २००९ या काळात पाचवेळा न्यूझीलंड दौरा केला आहे. त्यावेळी वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवर मदत मिळत होती. २००९ मध्ये अखेरच्या दौऱ्यात येथे धावा काढणे सोपे झाले होते. न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांमध्ये आता बरेच बदल झाले असल्यामुळे गेल्या काही वर्षात कसोटीत खूप धावा निघाल्या.’

सचिन पुढे म्हणाला की, ‘२००९ मध्ये हॅम्लिटनची खेळपट्टी वेगळी होती. वेलिग्टंन आणि नेपियरची खेळपट्टी टणक होती, तर हॅमिल्टनची खेळपट्टी नरम होती. काही काळानंतर नेपियर मैदानाची खेळपट्टी टणक झाली होती. मला वाटते की पहिल्या दौºयानंतर (१९९० ते २००९) या काळात खेळपट्टी टणक होत गेली. भारतीय संघाकडे गोलंदाजीत वेगवान आणि फिरकी यांचे शानदार आक्रमण आहे. भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये प्रतिस्पर्धा करण्यास सक्षम आहे.’ (वृत्तसंस्था)

वेलिंग्टनमध्ये हवेचा गोलंदाजीवर फरक पडू शकतो. फलंदाजांनी याबाबतीत सतर्क राहिले पाहिजे. मझ्या मते फिरकीपटूंनी हवेच्याविरुद्ध दिशेने गोलंदाजी करावी आणि जलदगती गोलंदाजांनी हवेच्या बाजुनेच गोलंदाजी करावी. रोहितनेच सलामीला खेळावे. कारण तो या आधीही येथे खेळला आहे. त्याला तेथील परिस्थितीचा अंदाज आहे. मात्र कसोटीतील आव्हाने वेगळी असतात.
- सचिन तेंडुलकर

Web Title: pitch changes in New Zealand - Sachin Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.