ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांमध्ये आता धाक राहिलेला नाही

भारताच्या तुलनेत मात्र वेगवान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 05:02 AM2020-11-18T05:02:23+5:302020-11-18T05:05:04+5:30

whatsapp join usJoin us
The pitch in Australia is no longer intimidating | ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांमध्ये आता धाक राहिलेला नाही

ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांमध्ये आता धाक राहिलेला नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली: भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा असेल तर सर्वांत आधी चर्चा रंगते ती तेथील खेळपट्ट्यांचीच. भारतासह आशियातील संघांना तेथील खेळपट्ट्यांशी तळमेळ साधणे कठीण होऊन जायचे. ‘आता मात्र तशी धसका घेण्यासारखी स्थिती राहिलेली नाही,’ असे मत ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक्‌ग्रा याने व्यक्त केले आहे. मॅक्‌ग्राने जगभरातील फलंदाजांना धडकी भरवली होती. ऑस्ट्रेलिायात वेगवान आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर तो अधिकच भेदक ठरायचा. आपल्या अचूक माऱ्यासाठी प्रख्यात असलेल्या मॅक्‌ग्राने ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांविषयी भाष्य केले. तो म्हणाला,‘ वेगवान आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांबाबत विचाराल तर सध्या ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या आधीसारख्या धोकादायक राहिलेल्या नाहीत. भारताच्या तुलनेत मात्र त्या अधिक वेगवान आहेत, इतकेच.’


  चेंडू उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांबाबत भारतीय खेळाडूंमध्ये धडकी असते, असे आम्हाला येथे ऐकायला मिळायचे. तथापि टी-२० क्रिकेटच्या अनुभवामुळे कोणत्याही फलंदाजाला आता खेळपट्टीची भिती वाटत नाही. १९९३ ला मी खेळणे सुरू केले त्यावेळी ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांची वेगळी ख्याती होती. पर्थची खेळपट्टी अतिषय वेगवान आणि उसळी असलेली होती. सिडनीच्या खेळपट्टीवर चेंडू वेगाने वळण घ्यायचा. ॲडिलेडची खेळपट्टी चौथ्या आणि पाचव्या दिवशी वळण घेत असे.ब्रिस्बेनमधील खेळपट्टीवर चेंडू रिव्हर्स स्विंग व्हायचा. मेलबोर्नच्या खेळपट्टीचा स्वभाव वेगळाच होता. खेळपट्ट्यांमधील विविधतेमुळेच ऑस्ट्रेलिया संघ कुठल्याही खेळपट्टीवर लवकरच प्रभावी ठरतो. माझे करिअर संपेपर्यंत ऑस्ट्रेलियातील प्रत्येक खेळपट्टी विदेशी फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणारी असायची. याचा परिणाम पुढच्या  पीढीतील खेळाडूंवर झाला. मी मात्र निराश आहे.’


भारतीय खेळाडू आधी ऑस्ट्रेलियात खेळायचा घाबरायचे. आता तशी स्थिती राहिलेली नाही. मागच्या मालिकेत भारताने विजय देखील मिळवला आहे. 
आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसोबत खेळण्याचा भारतीयांना लाभ झाला. एकाच संघात खेळल्यामुळे अनेक वैशिष्टये माहिती होतात. प्रतिस्पर्धी संघातही सामान्य खेळाडू आहेत, याची जाणिव होते, असे मॅक्‌ग्राला वाटते.


भारतीय संघाची सर्वांत मोठी समस्या ही की ते चौथ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करताना १५० च्या वर धावा करताना दिसत नाहीत. मागच्या ऑस्ट्रेलिया दौर्यात १९० धावांचा पाठलाग करण्यात भारत अपयशी ठरला होता. त्याआधी द. आफ्रिकेत भारताला चौथ्या डावात विजयासाठी २२० धावांचा अडथळा पार करता आला नव्हता, याकडे मॅक्‌ग्राने लक्ष वेधले आहे. 
 

Web Title: The pitch in Australia is no longer intimidating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.