Join us

आधी चहलची 'लिपस्टिक'संदर्भात 'बोलंदाजी'; आता कथित गर्लफ्रेंड RJ महावश शॉपिंगमुळे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:25 IST

Open in App
1 / 8

भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर RJ महावश यांच्यात डेटिंगचा खेळ सुरु असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगताना दिसत आहे.

2 / 8

'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये सहभागी झाल्यावर चहलनं दोघांच्या प्रेम फुलत असल्याची गोष्ट खरी असल्याची हिंटही दिलीये. तुझ्या शर्टवर लिपस्टिक कुणाची? या प्रश्नावर चहलनं ही गोष्ट संपूर्ण देशाला माहितीये, असे म्हणत अप्रत्यक्षपणे आरजे महावशसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे संकेत दिले.

3 / 8

'द ग्रेट इंडियन कपिल शो'मधील 'लिपस्टिक'संदर्भातील चहलची 'बोलंदाजी' चर्चेत असताना त्याची कथित गर्लफ्रेंड RJ महावशच्या नव्या शॉपिंगची गोष्ट चर्चेत आलीये.

4 / 8

IPL मध्ये पंजाब किंग्जसह युजवेंद्र चहलला चीअर करण्यासाठी क्रिकेट स्टेडियमवर दिसणाऱ्या आरजे महावश ही आता क्रिकेट संघाची मालकीण झालीये.

5 / 8

आरजे महावश ही चॅम्पियन्स लीग टी१० स्पर्धेतील संघाची सह मालकीण झालीये. तिने नेमकी कोणत्या संघात गुंतवणूक केलीये ते अद्याप गुलदस्त्यातच आहे. पण ती या शॉपिंगमुळे चर्चेत आलीये.

6 / 8

आरजे महावश सोशल मीडियावर चांगली सक्रीय असते. अनेकदा तिच्या जाहिरातीच्या खास फ्रेममध्येही चहलची झलक पाहायला मिळते.

7 / 8

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात घटस्फोट झाल्यापासून ती सातत्याने चहलच्या अवती भोवती वावरताना दिसली आहे.

8 / 8

फेम मिळवण्यासाठी चहलसोबत जवळीक साधल्याचा आरोपही तिच्यावर करण्यात आला. हा ब्लेम करणाऱ्यांना तिने आपली लोकप्रियता दाखवून देत सडेतोड उत्तरही दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

टॅग्स :ऑफ द फिल्डयुजवेंद्र चहल