Join us  

Dhanashree Verma: १४ वेगवेगळ्या प्रकारच्या लूकमध्ये दिसली युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री, फॅन्स म्हणाले तुला कुठला रंग आवडतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 7:51 PM

Open in App
1 / 7

भारतीय क्रिकेट संघातील लेग स्पिनर युझवेंद्र चहल सध्या पत्नी धनश्री हिच्यासोबत जम्मू काश्मीरमध्ये सहलीसाठी गेला आहे. डेंटिस्ट आणि यूट्युबर असलेली धनश्री वर्मा तिथून तिचे फोटो नियमितपणे शेअर करत आहे. तसेच त्यावर फॅन्सकडून वेगवेगळ्या रिअॅक्शन व्यक्त केल्या जात आहेत.

2 / 7

सध्याच धनश्रीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती १४ वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. या पोस्टमध्ये धनश्रीने फॅन्सना विचारले की, तुम्हाला या रंगांमधील कोणता रंग आवडतो. धनश्रीने या लूकला फ्रायडे स्पेशल Boomerang dump म्हटले आहे.

3 / 7

धनश्रीने हल्लीच जम्मू-काश्मीरमधून आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये बर्फाने आच्छादलेल्या भागात ती बाईक चालवताना दिसत आहे. त्याबरोबरच तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, चालत राहा आणि चालवत राहा. २०२२ चा हाच एक मंत्र आहे.

4 / 7

युझवेंद्र चहल आणि धनश्रीचा वर्षभरापूर्वी २२ डिसेंबर रोजी विवाह झाला होता. यावर्षी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी हे जोडपे जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले होते. चहल आणि धनश्री सुमारे दोन आठवड्यांपासून जम्मू काश्मीरमध्ये फिरत आहेत.

5 / 7

काश्मीरमध्ये फिरत असताना धनश्रीने जम्मू-काश्मीरमधून काही व्हिडीओसुद्धा पोस्ट केले आहेत. ते फॅन्सना खूप आवडले आहे. अशाच एका व्हिडीओमध्ये ती तिचा पती युझवेंद्र चहलसोबत दिसत आहे. युझवेंद्र चहलने २०२० मध्ये डेंटिस्ट आणि कोरियोग्राफर धनश्री हिच्याशी विवाह केला होता.

6 / 7

युझवेंद्र चहल सध्या भारतीय संघाबाहेर आहे. तसेच आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही त्याला रिलिज केलं आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार आता चलह लवकरच आयपीएलमधील नवा संघ असलेल्या लखनौच्या संघामध्ये दाखल होऊ शकतो.

7 / 7

धनश्री ही पेशाने डेंटिस्ट आणि युट्यूबर आहे. ती उत्तमप्रकारे कोरियोग्राफीही करते. लॉकडाऊनमध्ये डान्स क्लासदरम्यान, युझवेंद्र चहलची ओळख धनश्रीशी झाली होती. येथूनच या दोघांमधील प्रेम वाढू लागले. त्यानंतर काही दिवसांतच दोघेही विवाह बंधनात अडकले. या दोघांनीही २२ डिसेंबर २०२० रोजी लग्न केलं होतं.

टॅग्स :युजवेंद्र चहलभारतीय क्रिकेट संघजम्मू-काश्मीरसोशल व्हायरल
Open in App