Join us
Daily Top 2Weekly Top 5

युजवेंद्र चहल-आरजे महवश दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 18:41 IST

Open in App
1 / 10

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आरजे महवश ही जोडी गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळाले.

2 / 10

युजवेंद्र चहल याने कोरिओग्राफर धनश्री वर्मासोबत घटस्फोट घेतल्यावर आरजे महवशच्या रुपात युजवेंद्र चहलला नवे प्रेम मिळाले अशी चर्चाही रंगली. कारण चहलच्या आयुष्यातील वादळानंतर ती सातत्याने त्याच्यासोबत स्पॉट झाली.

3 / 10

क्रिकेटर चहल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आरजे महवश यांच्या सातत्याने व्हायरल होणाऱ्या फ्रेममुळे दोघांच्या प्रेम फुलत असल्याची चर्चाही रंगली.

4 / 10

आयपीएल स्पर्धेदरम्यान आरजे महवश चहल आणि प्रीतीच्या पंजाब किंग्जच्या संघाला चीअर करतानाही दिसली होती. सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या फोटोमुळे दोघांच्यात प्रेमाचा खेळ रंगल्याची चर्चा अधिक जोर धरताना दिसली.

5 / 10

आर जे महवश सोशल मीडियावरील सक्रीय चेहरा आहे. IPL मध्ये PBKS च्या सामन्यावेळी मैदानातील तिची खास झलक अन् तिच्या चेहऱ्यावरील उत्साह हा चहलच्या प्रेमाचा एक भाग आहे, असेच वाटत होते.

6 / 10

प्रेमाचा खेळ रंगल्याची चर्चा जोर धरत असताना क्रिकेटर चहलसह या सुंदरीनं आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, असे सांगत प्रेमाची गोष्ट ही एक अफवा असल्याचे स्पष्ट केले.

7 / 10

पण आता या दोघांच्या मैत्रीतही दरी निर्माण झाल्याची गोष्ट समोर येत आहे. कारण दोघांनी सोशल मीडियावरुन एकमेकांना अनफॉलोही केले आहे.

8 / 10

चहलसाठी चीअर गर्ल होऊन मिरवणाऱ्या आरजे महवश हिला क्रिकेटरची कोणती गोष्ट खटकली? दोघांच्यातील मैत्रीच्या नात्यात असं काय घडलं? यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे.

9 / 10

दोघांच्यात वाद झाल्याचे बोलले जात आहे. पण ना चहल यावर काही बोलला आहे ना आरजे महवश हिने यासंदर्भात काही प्रतिक्रिया दिली आहे.

10 / 10

आरजे महवश हिने चहलसोबतचे शेअर केलेले फोटो अजूनही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिसत आहेत. त्यामुळे नेमकं एकमेकांना अनफॉलो करण्यामागचं कारण काय? ते दोघांपैकी एकाची अधिकृत प्रतिक्रिया आल्याशिवाय समजणे मुश्किलच आहे. चहल फार कमी वेळा या मुद्यावर व्यक्त होतो. पण महवश ही फार काळ यावर मौन बाळगणार नाही.

टॅग्स :युजवेंद्र चहलऑफ द फिल्डव्हायरल फोटोज्