भारताचा आक्रमक डावखुरा फलंदाज युवराज सिंगने 19 सप्टेंबर 2007 रोजी सहा चेंडूत सहा षटकार ठोकले होते. या विक्रमाला आज दहावर्ष पूर्ण झाली.
युवराजने या सामन्यात 16 चेंडूत 58 धावा तडकावल्या होत्या. यात सात षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता.
युवराजने 19 व्या षटकात सहा चेंडूत सहा षटकार ठोकून स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीची पिस काढली होती.
भारताने इंग्लंड विरुद्धचा हा सामना 18 धावांनी जिंकला. भारताने चार बाद 218 धावा केल्या. इंग्लंडने निर्धारीत 20 षटकात सहा बाद 200 धावा केल्या.