Join us  

Yuvraj Singh Shocking Revelations on MS Dhoni: "तेव्हा अचानक मला बाजूला केलं अन् काहीही संबंध नसताना धोनीला कर्णधार केलं"; युवराज सिंगचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2022 8:25 PM

Open in App
1 / 6

Yuvraj Singh Shocking Revelations on MS Dhoni: युवराज सिंग हा भारताचा एक दमदार माजी फलंदाज. युवराजने भारताला २००७ आणि २०११ दोन्ही विश्वचषक जिंकवून देण्यात मोठा वाटा उचलला. पण तो इतका सक्षम असूनही त्याच्या गळ्यात कधीच टीम इंडियाच्या कर्णधारपदाची माळ पडली नाही.

2 / 6

युवराजने IPL मध्ये पंजाब संघाचे कर्णधारपद भूषवले. पण त्याला त्यात फारसं यश आलं नाही. असे असले तरी ज्या टीम इंडियाला त्याने दोन वर्ल्डकप जिंकवून दिले, त्या संघाचे कर्णधारपद त्याच्यापासून लांब का गेले, याबद्दलचा गौप्यस्फोट युवराजने नुकताच केला.

3 / 6

'मी संघाचा कर्णधार होणार होतो. त्यावेळी ग्रेग चॅपेल यांच्याबद्दलचं वादग्रस्त प्रकरण घडलं. त्यावेळी सचिन किंवा ग्रेग चॅपेल असं निवडण्याची वेळ आली होती. मी माझ्या सहकारी खेळाडूची उघडउघडपणे बाजू घेतली. तिथून गोष्टी बदलल्या.'

4 / 6

'मी जेव्हा सचिनच्या बाजूने उभा राहिलो त्यावेळी BCCI च्या काही अधिकाऱ्यांना ती गोष्ट रूचली नाही. त्यानंतर त्यांनी मनाशी पक्कं ठरवलं की आपण दुसऱ्या कोणालाही कर्णधार करू पण याला कर्णधार करायचं नाही. असं घडल्याचं माझ्याही कानावर आलं.'

5 / 6

'माझ्या कानावर आलेल्या गोष्टी किती खऱ्या ते मला माहिती नाही. पण त्यानंतर एक विचित्र गोष्ट घडली. मी उपकर्णधार होतो, मला अचानक त्या पदावरून दूर करण्यात आलं आणि सेहवाग संघाचा भाग नसल्याने काही ध्यानीमनी नसताना २००७च्या टी२० वर्ल्ड कपसाठी धोनीला कर्णधार बनवण्यात आलं. खरं पाहता ती संधी माझी होती', असा गौप्यस्फोट युवराज सिंगने केला.

6 / 6

'विरेंद्र सेहवाग हा आमच्यात सिनियर खेळाडू होता. तो इंग्लंड दौऱ्यावर नव्हता. राहुल द्रविड कर्णधार असताना मी उपकर्णधार होतो. त्यामुळे टी२० वर्ल्डकपसाठी मी कर्णधार होणार असा मला विश्वास होता. पण माझ्या सहकाऱ्याला पाठिंबा देणं मला महागात पडलं. असं असलं तरी मला त्याचा अजिबात पश्चात्ताप नाही. यापुढे माझ्या मित्रांना गरज पडल्यासही मी त्यांना सपोर्ट करेन', असंही युवराजने स्पष्टपणे सांगितलं.

टॅग्स :युवराज सिंगमहेंद्रसिंग धोनीसचिन तेंडुलकरभारतीय क्रिकेट संघ
Open in App