तिन्ही प्रकारात शतक झळकवणाऱ्या ५ युवा फलंदाजांच्या यादीत ३ भारतीय; पण वर्ल्ड रेकॉर्ड झिम्बाब्वेचा

इथं एक नजर टाकुयात यशस्वीसह तिन्ही प्रकारात शतकी खेळी करणाऱ्या युवा फलंदाजांवर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात यशस्वी जैस्वाल याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

या खेळीसह यशस्वीनं आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात शतके झळकवण्याची कामगिरी नोंदवत खास एलिट क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे.

इथं एक नजर टाकुयात यशस्वीसह तिन्ही प्रकारात शतकी खेळी करणाऱ्या युवा फलंदाजांवर

झिम्बाब्वेचा ब्रायन बेनेट हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकवणारा जगातील सर्वात युवा फलंदाज आहे. २१ वर्षे आणि ३२४ दिवस वय असताना त्याने ही कामगिरी करुन दाखवली होती.

पाकिस्तानच्या अहमद शहजाद याने २२ वर्षे आणि १२७ इतके वय असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात शतके झळकण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे.

भारतीय कसोटी आणि वनडेचा विद्यमान कर्णधार शुभमन गिलचाही या यादीत समावेश आहे. गिलनं २३ वर्षे आणि १४६ दिवस वयात तिन्ही प्रकारात शतक झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.

सुरेश रैना हा भारताचा पहिला असा क्रिकेटर आहे ज्याने तिन्ही प्रकारात शतक झळकावले होते. २३ वर्षे आणि २४१ दिवस वय असताना त्याने ही कामगिरी केली होती.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात २३ वर्षे आणि ३४३ दिवस वय असताना यशस्वीनं वनडेतील पहिल्या शतकासह तिन्ही प्रकारातील शतकी रकाना भरला. अशी कामगिरी करणारा तो पाचवा युवा फलंदाज ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात शतक झळकवणाऱ्या आघाडीच्या पाच युवा फलंदाजांमध्ये तीन भारतीय खेळाडूंची नावे असली तरी ब्रायन बेनेटच्या कामगिरीमुळे वर्ल्ड रेकॉर्ड मात्र झिम्बाब्वेच्या नावे असल्याचे दिसून येते.